भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची शिक्षण परिषद झाली. या परिषदेत विविध विषयावर चर्चा झाली. गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव दिल्यास प्रगती होते, असे ते म्हणाले.दरम्यान, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भुसावळ तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यौंचा गुणगौरव संमारंभ यावेळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उषा चिल्ड्रन सायन्स सेंटरचे अध्यक्ष जीवन महाजन, नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सील ऑफ यंग सायंटीस्टचे संचालक सुनील वानखेडे, केंद्रप्रमुख अश्पाक शेख, जावेद शेख, साजीद शहा, रिजवान खान, तवाब खान, कबीरखान आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचेे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम मिस्बाह नाज जावेद, द्वितीय कशफ शेख युनुस, कुऱ्हा, तृत्तीय अकसा शकील शेख यांनी यश मिळवले.
कंडारी येथे गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 2:47 PM