यांचा झाला सन्मान
२०१९ -२० : मनीषा गोविंद चौधरी (शिरसाळे), सचिन हिलाल पाटील, (पिंपळगाव बुद्रूक), समाधान रामचंद्र जाधव (शिंदी, भुसावळ), मालती संजय तायडे (बोदवड), गोरख मोतीराम वाघ (शिंदी, चाळीसगाव), संजीव सीताराम शेटे (चौगाव), ज्योती लीलाधर राणे (साळवा), विनायक गोकुळ वाघ (खेडी बुद्रूक), सुनील भागवत चौधरी (पाथरी), नथ्थू धनराज माळी (चिंचखेडे बुद्रूक), सुशीला वसंत हडपे (मुक्ताईनगर), किशोर अभिमन पाटील (वडगाव बुद्रूक), वैशाली अशोक नांद्रे (बोळे तांडा), कल्पना दिलीप पाटील (निंबोळ), विनोद मनोहर सोनवणे, (डांभूर्णी), प्रवीण वसंतराव पाटील (जळगाव), कांचन शैलेश राणे (भुसावळ).
२०२०- २१ : दिनेश रमेश मोरे (मारवड), मनीषा सुपडू पाटील (वडधे नवे), नामदेव शालिग्राम महाजन (मोंढाळे), योगेश मुरलीधर घाटे, (नाडगाव), ओमप्रकाश रतन थेटे (पिंपळगाव प्र.चे), सोमनाथ खंडू देवराज (वेले), माधुरी उत्तम देसले (दोनगाव), पद्माकर काळू पाटील (टाकरखेडा), मोनिका विजय चौधरी (वडली), माया प्रकाशराव शेळके (खादगाव), विकास ज्ञानदेव पाटील (टाकळी), सुभाष संतोष देसले (चिंचपुरे), गजाला तबस्सुम सै. असगर अली, संदीप सुरेश पाटील (डांभुर्णी).
आमदार चिमणरावांसाठी डॉ.मानेंनी खुर्ची सोडली
व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने सोबत बसले होते. एरंडोल पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील हे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळाने हजर झाले. आल्यानंतर जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व हर्षल माने उठले त्या जागेवर चिमणराव पाटील बसले. शेजारी विष्णू भंगाळे बसले व हर्षल माने यांनी त्यांना जागा देऊन ते दुसऱ्या जागेवर बसले. शिवसेना जिल्हाप्रमुखपदी डॉ. हर्षल माने यांची निवड झाल्यानंतर पारोळ्यात शिवसेनेत राजकीय वातावरण तापले होते. आमदार चिमणराव पाटील व डॉ. हर्षल माने यांच्यातील मतभेद समोर आले होते. त्यातच आज शिक्षकसेना पुरस्कार सोहळ्यातील हा प्रकार लक्षवेधी ठरला.