सुनील पाटीलजळगाव :पोलीस दलात गुन्ह्यांशी संबंधित उत्कृष्ट कामगिरी तसेच समाजात जावून चांगले काम करणा-यांचा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शुक्रवारी गुन्हे आढावा बैठकीत गौरव केला. या गौरव सोहळ्याने हे कर्मचारी व पोलीस पाटील यांची छाती भरुन आली आहे, भविष्यात चांगले काम करणा-यांची उर्जाच त्यांना या निमित्ताने मिळाली आहे.विजयसिंग पाटील व नरेंद्र वारुळे यांचे कार्य खरोखरच गौरवास्पद आहे. त्यांच्या कार्याची प्रथमच दखल घेण्यात आली. या कर्मचा-यांना गौरव सोहळा पाहून अन्य कर्मचाºयांनीही आपणही अशा गौरवास पात्र ठरले पाहिजे, त्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. पोलीस दलात आजही अनेक अधिकारी व कर्मचारी कुठलाही स्वार्थ न ठेवता कर्तव्य म्हणून आपले चोख कामगिरी बजावत आहेत. तर आजही अनेक कर्मचारी असे आहेत की ते आपले कर्तव्य व जबाबदारी विसरले आहेत. जो कर्मचारी काम करतो..तो कामच करीत असतो...काही जण सरकारी पगार घेऊन अधिका-याच्या घरची कामे करतात..व त्याच्यातच ते धन्यही मानतात. तत्कालिन पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित यांनीही या मुद्यावर मर्मस्पर्श पत्र लिहिले आहे. कोणताही पोलीस कर्मचारी अधिका-यांचे घरचे किंवा त्यांच्या बायकांचे कामे करण्यासाठी नाही...अनेक अधिकारी मुलांना शाळेत सोडणे, भाजी आणणे, बायकोला पार्लरला घेऊन जाणे असे कामे कर्मचा-यांना लावतात व कर्मचारीही ती मुकाट्याने करतात..यावर दिक्षित यांनी आक्षेप घेत पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. ही परिस्थिती मुंबईपासून नागपूरपर्यंत सारखीच आहे. जळगावाताही काही फारशी वेगळी नाही. काही कर्मचा-यांची घरघडी म्हणूनच ओळख तयार झाली आहे. अशा कर्मचा-यांकडून तपासाची काय अपेक्षा करणार...विशेष म्हणजे अशाच कर्मचा-यांच्या सोयीनुसार बदल्या तसेच पदके मिळतात..हे मोठे दुर्देव आहे.काम करणा-यांची छाप पडतेच...तसेच दिखावू काम करणारेही उघडे पडतात...सातत्याने क्राईम वाढत असताना प्रत्येक कर्मचा-यावर जबाबदारी निश्चित करुन त्याचा पंधरा दिवसांनी आढावा घेतल्यास कामचुकार कर्मचारी वठणीवर येतील. तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी हाच प्रयोग राबवून कामचुकारांना कामाला जुंपले होते...आता तोच प्रयोग राबविण्याची वेळ आली आहे. तेव्हाच गुन्हे नियंत्रणात राहतील व घडलेल्या गुन्ह्यांचाही उलगडा होऊ शकतो.
उत्कृष्ट काम करणा-यांचा गौरव, मग काम न करणा-यांचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 11:45 AM
पोलीस दलात गुन्ह्यांशी संबंधित उत्कृष्ट कामगिरी तसेच समाजात जावून चांगले काम करणा-यांचा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शुक्रवारी गुन्हे आढावा बैठकीत गौरव केला. या गौरव सोहळ्याने हे कर्मचारी व पोलीस पाटील यांची छाती भरुन आली आहे, भविष्यात चांगले काम करणा-यांची उर्जाच त्यांना या निमित्ताने मिळाली आहे.विजयसिंग पाटील व नरेंद्र वारुळे यांचे कार्य खरोखरच गौरवास्पद आहे. त्यांच्या कार्याची प्रथमच दखल घेण्यात आली.
ठळक मुद्देविश्लेषणगुन्ह्यांचा आलेख वाढतच चाललाघरगुती कामांनाही जुंपले कर्मचा-यांना