जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्युकरमायकोसिस या आजाराच्या शस्त्रक्रियेसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी ही समिती गठीत करण्याचे आदेश देऊन ही समिती गठीत केली आहे.
या समितीत कान, नाक, घसा विभागाचे डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत, नेत्र शल्य चिकित्सा विभागाचे डॉ. प्रसन्ना पाटील, डॉ. अंजली सिंग, दंत शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रृती शंकपाळ, शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. सुबोध महाले, बधिरीकरण शास्त्र विभागाचे डॉ. स्वाती एम., डॉ. काजल साळुंखे, शरीरविकृतीशास्त्र विभागाचे डॉ. भारत घोडके, डॉ. अदिती सरनायक, क्ष किरण शास्त्र विभाग डॉ. उत्कर्ष पाटील, डॉ. पराग गारसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे आणि अधिसेविका कविता नेतकर यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
गुरुवारी पहिली शस्त्रक्रिया होण्याची शक्यता
म्युकरमायकोसिसच्या उपचारांत काही रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते. या शस्त्रक्रियेसाठी विविध विभागांच्या तज्ज्ञांची गरज भासते. त्यामुळे ही समिती गठीत करण्यात आली आहे. गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्युकरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.