वरखेडी : येथील गुरांचा बाजार डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने काही व्यापाऱ्यांनी वरखेडी येथील बसस्थानक परिसरातच राज्य मार्गाला हमरस्त्याला लागून शेळ्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
रस्त्याला खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविण्यासाठी व आपल्या वाहनाचा कुणाला धक्का लागू नये, यासाठी कसरत करतानाचे चित्र दिसून येत होते. याठिकाणी अपघात होण्यासारखी परिस्थिती होती. याबाबत पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांना माहिती मिळताच त्यांनी तडक पोलीस उपनिरीक्षक डिगंबर थोरात यांना या परिस्थितीची सूचना देऊन हा प्रकार थांबवण्याचे आदेश दिले. सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह याठिकाणी शेळ्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद पाडले व त्यांना तेथे न बसण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे हा रस्ता आता मोकळा झाला आहे.