जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव वाढत जाऊन वर्षभरात सोने तब्बल ७ हजार २०० रुपये प्रती तोळा तर चांदी साडेतीन हजार रुपये प्रती किलोने महागली आहे.सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. गेल्या वर्षी २ आॅगस्ट २०१८ रोजी ३० हजार २०० रुपयांवर असलेले सोने या वर्षी आॅगस्ट महिन्यात ३७ हजाराच्या पुढे गेले आहे.९ सप्टेंबर रोजी ते ३१ हजार रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर नवरात्रोत्सवापासून सोने पुन्हा वधारत जाऊन १४ आॅक्टोबर २०१८ रोजी सोन्याने ३२ हजारावर झेप घेतली. १० डिसेंबर २०१८ रोजी ते ३२ हजार ४०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले होते. त्यानंतर डॉलरचेही भाव कमी होत गेल्याने सोन्याचे भाव घसरत जावून मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ते ३३ हजारावर आले. त्यानंतर पुन्हा भाव कमी होत जाऊन २ एप्रिल रोजी ३२ हजार ३०० रुपये प्रती तोळा झाले होते. मे महिन्यापासून पुन्हा वाढ होत जाऊन सोने वाढत जाऊन १५ मे रोजी ३२ हजार ९०० रुपयांवर पोहचले. तेव्हापासून ही वाढ अशीच सुरू राहून ६ जून २०१९ रोजी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने ३३ हजार १०० रुपयांवर पोहचले. २१ जून रोजी सोन्याचे भाव ३४,२०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर ९ जुलै रोजी ३४ हजार ८०० आणि १० रोजी ३५ हजार रुपये प्रती तोळ््यावर सोने पोहचले. ५ आॅगस्ट रोजी सोने ३५ हजार ८०० रुपये व दुसऱ्याच दिवशी ६ आॅगस्ट २०१९ रोजी ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले व ७ रोजी तर ते ९०० रुपयांनी वाढून ३७ हजार ४०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर त्यात ५० रुपयांनी घसरण झाली असून सध्या ते ३७ हजार ३५० रुपयांवर स्थिर आहे.चांदीतही अशाच प्रकारे विविध कारणांनी वर्षभरात साडेतीन हजार रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २ आॅगस्ट २०१८ रोजी ३९ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीचे भाव सध्या ४३ हजार रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची वाढलेली खरेदी व दुसरीकडे भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोने-चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व कारणांमुळÞेच सोने वर्षभरात जवळपास ७ हजार रुपये प्रती तोळ््याने तर चांदी साडे तीन हजार रुपये प्रती किलोने वाढली आहे.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
वर्षभरात सोने ७ हजारांनी महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:57 AM