शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

सुवर्ण झळाली, सुवर्णनगरी जळगावात अक्षय्यतृतीयेला सोन्याची दुप्पट विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:02 PM

दुपारनंतर सराफ दुकानांमध्ये गर्दी

ठळक मुद्देभाववाढीनंतरही खरेदीचा उत्साहयंदाही सुखद चित्र

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १९ - साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेला सुवर्णनगरी जळगावात सोन्याला दुप्पट मागणी राहून तब्बल १० कोटींच्यावर उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रति तोळा ६०० रुपये भाववाढ होऊन सोने ३१ हजार ७०० रुपयांवर गेले तरी सोन्याला मागणी वाढून चांगलीच झळाळी आली.अक्षय्यतृतीयेला सोने खरेदीला अनन्य महत्त्व असल्याने जळगावात सोने खरेदीसाठी या दिवशी मोठी गर्दी होत असते. यंदाही असे सुखद चित्र पहावयास मिळाले.भाववाढनंतरही मागणीत वाढगेल्या आठवड्यात सोने ३१ हजार १०० रुपये प्रति तोळा होते. त्यानंतर त्यात ५०० रुपयांनी वाढ होऊन ते ३१ हजार ६०० रुपयांवर गेले. गेल्या दोन दिवसात पुन्हा यात वाढ झाली. १६ एप्रिल रोजी ३१ हजार ६०० रुपये असलेले सोन्याचे भाव १७ रोजी ३१ हजार ७०० रुपये झाले व १८ रोजी अक्षय्यतृतीयेच्या दिवशीदेखील ते ३१ हजार ७०० रुपयांवर स्थिर राहिले. अमेरिका व सिरीया यांच्यातील तणावामुळे सोन्याच्या भावात आठवडाभरात ६०० रुपयांची वाढ होऊन अक्षय्यतृतीयेला सोने ३१ हजार ७०० रुपये प्रति तोळा असले तरी विक्रीवर कोणताही परिणाम न होता विक्रीत उलट दुप्पट वाढ झाल्याचे शहरातील प्रमुख ज्वेलर्सच्यावतीने सांगण्यात आले. या प्रमुख सराफी दुकानांसह एकूण १५० फर्ममध्ये एकूण किती उलाढाला झाली याचा नेमका आकडा सांगणे कठीण असले तरी १० कोटींच्यावर विक्री झाल्याचे जाणकार सराफ व्यावसायिकांनी सांगितले.दुपारी वाढली गर्दीसोने खरेदीसाठी सकाळपासूनच ग्राहकी सुरू होती. मात्र दुपारी १२ नंतर गर्दी वाढत गेली. आजच्या मुहूर्तावर नवीन दागिने खरेदी तर झालीच सोबतच या मुहूर्तावर खरेदी केलेले सोने अक्षय राहते, अशी श्रद्धा असल्याने दागिने घ्यायचे नसले तरी किमान एक ग्रॅम सोने तरी खरेदी केले पाहिजे, याकडेही मोठा कल होता. त्यामुळे सुवर्ण बाजारात मोठी उलाढाल दिसून आली.दागिन्यांमध्ये शॉर्ट पोतला पसंती दिली जात होती. त्या सोबतच गळ््यातील चैन (सुवर्ण साखळी), मंगळसूत्र, कर्णफुले, बांगड्या, अंगठी यांचीही खरेदी झाली. या दिवशी सोने घेऊन ठेवायचे म्हणून सोन्याचे शिक्के, तुकडे यांचीही ग्राहकी होती.जळगाव शहरात सराफ दुकानांची संख्या १५०च्यावर आहे. यात प्रमुख दुकानामध्ये सोन्याचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येते. यामध्ये १०० ते २०० रुपयांची तफावत असते.अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठा उत्साह राहिला. दुपारी १२नंतर गर्दी वाढून आज दुकानात पाय ठेवायलादेखील जागा नव्हती, एवढा ग्राहकांचा प्रतिसाद राहिला.- अजयकुमार ललवाणी, संचालक, महावीर ज्वेलर्स, जळगाव.अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला. नेहमीपेक्षा आज सोने खरेदीसाठी ग्राहकांची चांगलीच गर्दी झाली होती.- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, आर.सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव.दररोजपेक्षा आज सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. नेहमीपेक्षा आज दुप्पट विक्रीचा अंदाज आहे.- भागवत भंगाळे, संचालक, भंगाळे गोल्ड, जळगाव.जळगावात सोने खरेदीस ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. आज सकाळपासूनच ग्राहकी सुरू झाली होती. दुपारनंतर ग्राहकीमध्ये चांगलीच वाढ झाली.- सतीश कुबेर, विक्री प्रमुख, पी.एन. गाडगीळ अ‍ॅण्ड सन्स, जळगाव. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाJalgaonजळगाव