जळगाव : शुभ व संपन्नतादायक अशा गुरूपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर ६ जून रोजी सुवर्णनगरी जळगावात सोन्याला चांगलीच मागणी वाढून नेहमीपेक्षा दीडपटीने उलाढाल वाढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याचे भाव वधारत ३३ हजार १०० रुपये प्रती तोळा तर चांदीतही एकाच दिवसात ५०० रुपये प्रती किलोने वाढ होऊन ती ३८ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे. विशेष म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरचे दर कमी होत असले तरी या वेळी सोन्याचे भाव वाढले आहेत.सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलरचे भाव यांचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. एरव्ही डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सुधारत गेला की सोन्याचे भाव कमी होतात. मात्र या वेळी गेल्या आठवड्यापासून रुपयात सुधारणा होत असली तरी सोन्याचे भाव वाढत गेले.लग्नसराईसह गुरुपुष्यामृत योगलग्न सराईमुळे सोन्याला मागणी कायम असून त्यात ६ जून रोजी गुरुपुष्यामृत योग आल्याने या दिवशी मागणीत आणखी भर पडली. भारतीय संस्कृतीत गुरुपुष्यामृत योगाला शुभ, संपन्नतादायक, मंगलदायी, वृद्धीदायक मानले जाते. या नक्षत्रात खरेदी केलेली कोणतीही वस्तू पावित्र्याची व मंगलमय मानतात. त्यामुळे या दिवशी सुवर्णखरेदीला विशेष महत्त्व असते. विशेष म्हणजे गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त रात्री ८.२८ वाजेपासून पुढे होता तरी सकाळपासून सोने खरेदीस गर्दी असल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे या मुहूर्तासाठी रात्री उशिरापर्यंत सुवर्ण दालने खुले ठेवण्यात आली. त्यामुळे दिवस व रात्रीची उलाढाल पाहता नेहमीपेक्षा दीडपटीने उलाढाल होऊन एकूण अधिकृत आकडा समजला नसला तरी सात ते आठ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.रुपयात सुधारणा तरी सोन्यात तेजीगेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात सुधारणा झाली तरी सोन्याचे भाव या वेळी वाढले आहेत. २९ मे रोजी डॉलरचे दर ६९.८२ रुपये असताना सोन्याचे भाव ३२ हजार ६०० रुपये होते तर ६ जून रोजी डॉलरचे हे दर कमी होऊन ते ६९.२६ रुपये झाले तरी सोन्याचे भाव ३३ हजार १०० रुपयांवर पोहचले आहेत.चांदीतही तेजीसोन्या सोबतच चांदीच्याही भावात एकाच दिवसात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून ३८ हजार रुपये प्रती किलोवर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात ६ जून रोजी ५०० रुपयांनी वाढ झाली व ती ३८ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे.अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांतील चढ-उतार यामुळे सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत असतो. सध्या सोन्याला चांगली मागणी असून गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने खरेदीला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.
गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोन्याला झळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 11:33 AM