शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सुवर्णनगरीत दीडशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच २४ दिवस सुवर्ण बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 10:15 PM

लग्नाची खरेदी लांबणीवर

विजयकुमार सैतवालजळगाव : दीडशे वर्षांची सुवर्ण परंपरा असलेल्या सुवर्णनगरी जळगावातील सोने-चांदी बाजार गेल्या महिन्यांपासूनच कोरोनाचे परिणाम सहन करीत असून आता तर लॉक डाऊनमुळे प्रथमच सलग २४ दिवस बाजारबंद राहणार आहे. यामुळे विवाह सोहळ््याची खरेदीही लांबणीवर पडली असून ग्राहक व विक्रेतेही या बंदला स्वीकारत असून ‘जान है तो जहा...’ म्हणत सोने तर केव्हाही खरेदी करू, आता घरातच बसू असा निश्चय करीत आहे.जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे राज्यात २३ मार्चपासून सर्व दुकाने बंद आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केल्याने १४ एप्रिलपर्यंत सर्वच दुकाने बंद राहणार आहेत. यात सुवर्णपेढ्यादेखील आल्या. हा बंद आता होत असला तरी सुवर्ण बाजारावर गेल्या महिन्याभरापासूनच परिणाम जाणवत आहे.कोरोनामुळे मागणी कमी झाल्याने सोने-चांदीचे भाव सतत गडगडत राहिले. त्यानंतर मुंबईतील दुकाने बंद झाल्याने आयातच नसल्याने सोन्याचे भाव वाढू लागले. असे परिणाम होत असताना २२ रोजी जनता कर्फ्यू, २३ रोजी जमावबंदी व २४ रोजी राज्यात लॉक डाऊन जाहीर झाले. त्यामुळे सुवर्ण पेढ्या शनिवार, २१ मार्च नंतर उघडल्याच नाही. त्यात आता पंतप्रधानांनी देशभरात २१ दिवसांचे लॉक डाऊन जाहीर केल्याने १४ एप्रिलपर्यंत बंदची स्थिती राहणार आहे.प्रथमच एवढ्या दिवस बंदजळगावातील सुवर्ण बाजाराला दीडशे वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. येथील सोन्याला देशभरात पसंती असल्याने येथे नेहमी सोने खरेदीसाठी गर्दी असते. या दीडशे वर्षांच्या काळात विविध मागण्यांसाठी कधी चार ते पाच दिवस सुवर्ण बाजार बंद राहिला तर १९८४मध्ये उसळलेल्या दंगलीमुळे चार दिवस सुवर्ण बाजार बंद होता. त्यानंतर आता प्रथमच सलग २४ दिवस सुवर्ण बाजार बंद राहणार आहे.लग्नाची खरेदी लांबणीवरमार्च महिन्यात अनेक विवाह मुहूर्त होते. मात्र कोरोनाच्या सावटामुळे अनेकांनी ते लांबणीवर टाकले आहे. परिणामी सुवर्ण खरेदीही लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आता एप्रिलमध्येच पुन्हा सुवर्ण झळाळी येण्याची चिन्हे आहेत.सोने खरेदी तर नंतरही होईलसध्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी घरात राहणेच आवश्यक असल्याने सुवर्ण व्यावसायिक व ग्राहकही त्यास पसंती देत आहेत. सोने तर नंतरही खरेदी करता येईल, असे सांगत सर्व जण या बंदचा स्वीकार करीत आहे.जळगावातील सुवर्ण बाजाराच्या इतिहासात प्रथमच एवढ्या दिवस सुवर्ण बाजार बंद राहणार आहे. यामुळे विवाहसाठीची अनेकांची सोने-चांदी खरेदी लांबणीवर पडली आहे. असे असले तरी सध्या आपल्यासह देशवासीयांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने या बंदचा सर्व जण स्वीकार करीत आहे व आपापल्या घरी राहून एकप्रकारे देशसेवेला हातभार लावत आहे.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव