जळगाव : गेल्या आठवड्यात घसरणीने सुरुवात झालेल्या सुवर्णबाजारात या आठवड्यात पहिल्याच दिवशी भाववाढ झाली आहे. यात चांदीच्या भावात ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७० हजार ५०० रुपयांवर पोहचली. तसेच सोन्याच्याही भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ४७ हजार ५०० रुपयांवर पोहचले.
गेल्या आठवड्यात सुवर्णबाजारात मोठी घसरण पहायला मिळाली होती. गेल्या आठवड्यात सोमवार, १५ फेब्रुवारी रोजी आठवड्याच्या सुरुवातीलाच चांदीत एक हजाराने तर सोन्यात ६०० रुपयांची घसरण झाली होती. ही घसरण कायम राहत शुक्रवार, १९ रोजी पुन्हा भाव कमी झाल्याने सोने तर नऊ महिन्यांच्या निच्चांकीवर येऊन ते ४७ हजाराच्या खाली आले होते. तसेच चांदीतही एक हजार ८०० रुपयांची घसरण होऊन ती ६८ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली होती. त्यानंतर आता सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीत ५०० रुपयांची तर सोन्यात २०० रुपयांची वाढ झाली.