अमळनेर, जि.जळगाव : येथील पल्लवी श्रीपाद देशपांडे यांनी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात तीन सुवर्ण पदक प्राप्त केले. ही सुवर्ण पदके बडोद्याच्या राजमाता शुभंगिनी राजे गायकवाड व कुलगुरू डॉ. परिमल व्यास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.पल्लवी यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. करून विद्यापीठातर्फे एक, विभागातर्फे दुसरे व विषयात प्रथम अशी तिन्ही सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. या विषयात त्यांना गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्तीदेखील प्राप्त झाली होती.पल्लवी यांनी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बी. ए. राज्यशास्त्र विषयात प्रथम क्रमांक मिळविला होता. तसेच त्यांनीे अभ्यास केलेल्या भारत सरकारच्या बल्क एल.पी.जी. पॉलिसीच्या पुस्तकाचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते भुवनेश्वर येथे प्रकाशन झाले .हल्ली पल्लवी दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयात व्ही. मुरलीधरन परराष्ट्र व संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्याकडे रीसर्च अॅण्ड सोशल मीडिया असोसिएट या पदावर कार्यरत आहेत. पल्लवी येथील उदय देशपांडे सायली देशपांडे यांची सुकन्या आहे.
अमळनेरच्या पल्लवी देशपांडेची सुवर्ण पदकांची हॅट्ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 11:11 PM