जळगाव : सोने ४०० रुपयांनी तर चांदी ६०० रुपयांनी स्वस्त झाल्याने अनेक ग्राहकांनी अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत दागिन्यांची खरेदी केली, त्यामुळे दुपारनंतर सुवर्णनगरीतील सराफी बाजारात ग्राहकांची वर्दळ चांगलीच वाढली होती.
गुरुवारी सोन्याचे प्रति तोळा ६१ हजार रुपये दर होते. शुक्रवारी मात्र ४०० रुपयांनी दर घसरले आणि सोने ६० हजार ६०० रुपयांवर आले. तर चांदीच्या दरातही शुक्रवारी ६०० रुपयांनी घसरण झाली.गुरुवारी ७५ हजार ८०० रुपये प्रतिकिलोचा दर असणारी चांदी शुक्रवारी ७५ हजार २०० रुपयांवर आली होती. त्यामुळे अनेकांनी अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येलाच सोने खरेदीसाठी सराफी बाजार गाठला. बाहेरगावाहून अक्षय्य तृतीयेसाठी घरी आलेल्या पुणे, मुंबईतील अनेक जण सोने खरेदी करताना दिसले.