भुसावळ,दि.18- नातेवाईकांच्या मृत्यूनंतर तिस:या दिवशी अस्थी गोळा करण्यासाठी (सारी सरकट) गेलेल्या आप्तेष्टांना अस्थीच गायब होत असल्याचा अनुभव शहरातील यावल रोडवरील तापी नदीवरील स्मशानभूमीत येत असल्याने त्यांच्यात संतप्त भावना पसरल्या आहेत़ स्मशानातील या अस्थी सोनं मिळवण्याच्या लालसेपोटीच गायब होत असल्याचा सूरही या निमित्ताने उमटत आह़े
शहरातील यावल रोडवर सर्वाधिक मोठी हिंदू समाजाची स्मशानभूमी आह़े विशेष म्हणजे ही स्मशानभूमीला काही दिवसांपूर्वीच सामाजिक दात्यांनी गेटही बसवून दिले असून स्वतंत्र वॉचमनही नियुक्त करण्यात आला आहे मात्र असे असतानाही अस्थी व प्रेताची राख चोरीला जात असल्याने नातेवाईक संतप्त झाले आहेत़ अद्यापर्पयत कुणी पोलिसांर्पयत धाव घेतली नाही, हे विशेष !
महिनाभरात पाचव्यांदा प्रकार
गेल्या महिनाभरात पाच ते सहा वेळा हा प्रकार घडल्याची नागरिकातून बोलले जात आह़े मात्र कुटुंबियांचे नाव समाजात यायला नको म्हणून काही जणांनी चुप्पी साधल्याने अस्थी चोरणा:यांनी चांगलाच फायदा घेतल्याचे बोलले जात आह़े
स्मशानात मिळतेय सोनं
हिंदू समाजातील रिती-रिवाजानुसार घरातील स्त्री स्वर्गवासी झाल्यानंतर तिच्या तोंडात सोने ठेवले जाते शिवाय काही घरातील लोक नाकातील फुली वा कानातील सोन्याच्या वस्तू शक्यतो काढत नाहीत त्यामुळे जळाल्यानंतर आपसुकच ते सोनं मिळवण्यासाठी काहींचा प्रयत्न असतो़ हे सोनं मिळवण्यासाठीच बहुधा अस्थींसह राखेची चोरी होत असल्याचा संशय व्यक्त होत आह़े
स्मशानभूमीतील अस्थींसह राखेची चोरी झाल्याची बाब प्रथमच कानावर आली आह़े यापूर्वी असे प्रकार घडलेले नाही़ याबाबत स्मशानभूमीतील वॉचमनला विचारणा करण्यात येईल़ स्मशानभूमी जय गणेश फाऊंडेशनला दत्तक देण्याबाबत ठराव करण्यात आला होता मात्र त्यांच्याकडूनही काही उपाययोजना होत नसल्याने चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल़
-रमण भोळे,
नगराध्यक्ष, भुसावळ नगरपालिका