भुसावळ, जि.जळगाव : वकिलांसाठी येणारा काळ सुवर्णकाळ आहे. वकिलांनी मॉडल प्रॅक्टिसचा अवलंब करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अविनाश भिडे यांनी केले.नाशिक येथे १५-१६ फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यस्तरीय वकील परिषदेचा प्रचार करण्यासाठी ते आले असता भुसावळ वकील संघाला मार्गदर्शन करताना बोलत होते.वकिलांनी मॉडल प्रॅक्टिस करावी. याचा निश्चितच फायदा होईल. जलद न्याय मिळण्यास मदत होईल. भविष्यात ज्युडिशिअसकडे जाण्याचा कल जास्त होईल. यासाठी बार कौन्सिलतर्फे कोचिंग क्लासेस घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.महाराष्ट्र ,गोवा बार कौन्सिल स्थापन करणार जिल्हा फेडरेशनची समितीवकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर फेडरेशन समिती स्थापन करणार आहेत. त्यामध्ये संघाचे अध्यक्ष बार कौन्सिलचे सदस्य सभासद राहतील. त्यामुळे वकिलांना न्याय मिळेल व समस्या दूर होतील, असेही शेवटी ते म्हणाले.अशा आहेत वकील संघाच्या मागण्याशहरातील न्यायालयाच्या उत्तरेकडील बाजूला राज्य उत्पादन शुल्क विभागाची जागा उपलब्ध आहे. ती जागा वकील संघाला चेंबरसाठी देण्यात यावी. न्यायालयाच्या आवारात वकिलांना कंझ्युमर सोसायटीसाठी जागा त्वरित मिळावी. ई-लायब्ररीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. मेडिकल इन्शुरन्स विमा ग्रुप विमा काढण्यात यावा. त्यासाठी कमी प्रीमियममध्ये विमा वकिलांना उपलब्ध करून द्यावा. वाढीव दोन मजल्यांसाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन वकील संघातर्फे त्यांना देण्यात आले.याप्रसंगी भुसावळ तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील, उपाध्यक्ष अॅड.धनराज मगर, सचिव अॅड. रम्मू पटेल, अॅड.पुरुषोत्तम पाटील, महिला प्रतिनिधी जास्वंदी भंडारी, विजय तायडे, अशोक शिरसाठ, नरेंद्र महाजन, नितीन राजाने, वैशाली चौधरी, संजय तेलगोटे, श्याम गोंदेकर, महेश तिवारी उपस्थित होते.
येणारा काळ वकिलांसाठी सुवर्णकाळ-अॅड.अविनाश भिडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 7:49 PM
वकिलांसाठी येणारा काळ सुवर्णकाळ आहे. वकिलांनी मॉडल प्रॅक्टिसचा अवलंब करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अविनाश भिडे यांनी केले.
ठळक मुद्देमहाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड.अविनाश भिडे यांची भुसावळ वकील संघाला भेट वकिलांनी मॉडल प्रॅक्टिसचा अवलंब करावाबार कौन्सिलतर्फे कोचिंग क्लासेस घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणारमहाराष्ट्र ,गोवा बार कौन्सिल स्थापन करणार जिल्हा फेडरेशनची समितीन्यायालयाच्या आवारात वकिलांना कंझ्युमर सोसायटीसाठी जागा त्वरित मिळावीई-लायब्ररीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा