सकाळी ध्वजवंदन : शोभायात्रा मार्गावर प्रतिष्ठान सजावट स्पर्धाजळगाव : शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांच्या 2616व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन श्री संघाच्यावतीने आयोजित विविध कार्यक्रमातील मुख्य सोहळा 9 रोजी होणार असून भगवान महावीर स्वामी जयंतीदिनी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व उपक्रम सुरू आहेत. यामध्ये 9 रोजी जयंतीदिनी सकाळी साडेसहा वाजेपासून विविध ठिकाणी फळ व बिस्कीट वाटप करण्यात येणार आहे. साडेसात वाजता काँग्रेसभवन समोरील श्री वासुपूज्य जैन मंदिर येथे ध्वज वंदन होणार असून 8 वाजता याच ठिकाणापासून शोभायात्रेला सुरुवात होऊन बालगंधर्व सभागृहाजवळ तिचा समारोप होईल. शोभायात्रा मार्गावर असणा:या प्रतिष्ठानांसाठी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भगवान महावीर संदेश बॅनर सजावट स्पर्धादेखील घेण्यात येणार आहे. जैन नवयुवक मंडळाच्यावतीने बालगंधर्व सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता डॉ. बिपीन दोशी हे मार्गदर्शन करणार असून या वेळी गौतम प्रसादीचे लाभार्थी कणकमल राका यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्य़ाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन हे राहणार असून माजी खासदार ईश्वरलाल जैन, शाकाहार सदाचारचे प्रणेते रतनलाल बाफना, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, कणकमल राका यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल जैन श्री संघ व श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष दलुभाऊ जैन, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष सुगनचंद राका, श्री जैन श्वेतांबर तेरापंथ सभेचे अध्यक्ष मनोज सुराणा, श्री महावीर दिगंबर जिन चैत्यालय ट्रस्टचे अध्यक्ष राजेश जैन यांनी केले आहे. गो मातांना लापसी भोग8 रोजी सकाळी ट्रेझर हंट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 9 वाजता पांझरा पोळ येथे गो मातांना लापसी भोग दाखविण्यात आला. दुपारी 2 ते 5 दरम्यान श्री कच्छी दशा विसा महासंघातर्फे नवकार महामंत्र जाप करण्यात आला. 10 रोजी प.पू. जैनाचार्य 1008 श्री रामलालजी म.सा. यांच्या 64व्या जन्मोत्सवानिमित्त सागर भवन येथे दुपारी 3 ते 4 दरम्यान नवकार महामंत्र जाप होईल.
जळगावला भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2017 6:29 PM