लोकमत ऑनलाईन मुडी- बोदर्डे ता. अमळनेर, दि.15 : अमळनेर तालुक्यातील मुडी (नवेगाव ) येथे वसू बारसनिमित्त सोमवार, दि. 16 रोजी गोमातेचा यात्रोत्सव भरणार असून खान्देशातील ती एकमेव वैशिष्टय़पूर्ण यात्रा आहे. वसू बारस हा ‘प्रकाशपर्व ’ दीपावलीचा शुभारंभाचा दिवस असून त्याच दिवसापासून ही यात्रा सुरू होते, आणि ती दोन दिवस चालते. दोन दिवस येथे उत्साह ओसंडून वाहत असतो. हा यात्रोत्सव सुरु होण्यामागची कथा अशी, काही वर्षापूर्वी येथील रहिवासी शांतीलाल जैन यांनी गायीचे दान केले होते. काही कालावधीनंतर त्या गायीचा मृत्यू झाला. जेथे त्या गायीला पुरण्यात आले होते त्याच जागेवर ही यात्रा भरते. 1962पासून वसू बारसच्या दिवशी यात्रा भरवण्याची परंपरा सुरू झाली ती आजही कायम आहे. खान्देशातील एकमेव गोमातेची ही यात्रा असल्याने तिला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे यात्रेत परिसरातील भाविकांची आणि गो मातेवर असीम श्रद्धा असलेल्यांची मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते .
मुडी येथे आजपासून गोमातेचा यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 7:28 PM
प्रकाशपर्व दीपावलीला वसू बारसपासून प्रारंभ होत असतो, त्याच दिवशी ही गोमाता यात्रा भरते, ती दोन दिवस चालते.
ठळक मुद्देदान दिलेल्या गायीच्या मृत्युनंतर यात्रोत्सवाला सुरूवातश्रद्धाळू भाविकांची होते मोठी गर्दी