भुसावळ : कोरोना काळात रेल्वे प्रशासनाने राज्य अंतर्गत सर्व गाड्या बंद केल्या होत्या. प्रवाशांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या सणासुदीच्या काळात भुसावळ विभागातून मनमाड मुंबईनंतर आता राज्य अंतर्गत नागपूर-मुंबई दुरांतो व गोंदिया मुंबई विदर्भ अशा दोन गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाडीगाडी क्रमांक ०२२८९ डाउन मुंबई-नागपूर दुरांतो विशेष गाड़ी १० आॅक्टोबरपासून पुढील आदेशापर्यत प्रतिदिन २०:१५ वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी नागपूरला ०७:२० वाजता पोहचेल.गाडीला भुसावळ- स्थानकावर ०२:००/०२:०५ थांबा देण्यात आला आह.ेगाडी क्रमांक ०२२९० अप नागपूर-मुंबई दुरांतो विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून ९ आॅक्टोबरपासून पुढील आदेशापर्यत प्रतिदिन २०:४० वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी मुंबईला ०८:०५ वाजता पोहचेल. गाडीला भुसावळ स्थानकावर ०१:२०/०१:२५ वाजता थांबा देण्यात आला आहे.संरचना- ८ शयनयान श्रेणी, ९ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १ वातानुकूलित प्रथम श्रेणीचे कोच असतील.गोंदिया-मुंबई विशेष गाडीगाडी क्रमांक ०२१०६ अप गोंदिया- मुंबई विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून १० आॅक्टोबरपासून पुढील आदेशापर्यत प्रतिदिन १५:०० वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी मुंबईला ०७:०० वाजता पोहचेल.गाडी क्रमांक ०२१०५ डाउन मुंबई-गोंदिया विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशनपासून ९ आॅक्टोबरपासून पुढील आदेशपर्यत प्रतिदिन १९:०५ वाजता रवाना होऊन दुसºया दिवशी गोंदियाला ११:२० वाजता पोहचेल.थांबा- नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा.संरचना- १० शयनयान श्रेणी, ५ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ३ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, ५ सेकंड क्लास सीटिंग.आरक्षण- विशेष ट्रेनचे बुकिंग ८ आॅक्टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेत स्थळावर सुरू होईल.प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्य स्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहेदरम्यान, हळूहळू कोरोना काळात राज्य अंतर्गत गाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : महाराष्ट्र अंतर्गत दोन विशेष गाड्या धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 5:00 PM
प्रवाशांसाठी खुशखबर असून रेल्वे प्रशासनाने येणाऱ्या सणासुदीच्या काळात भुसावळ विभागातून मनमाड मुंबईनंतर आता राज्य अंतर्गत नागपूर-मुंबई दुरांतो व गोंदिया मुंबई विदर्भ अशा दोन गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत.
ठळक मुद्देनागपूर-मुंबई दुरांतो व मुंबई गोंदिया विदर्भ एक्सप्रेस हळूहळू कोरोना काळात राज्य अंतर्गत गाड्या सुरू होत असल्याने प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार