जळगाव : बाजार समितीची संरक्षक भिंत तोडताना कोणत्याही वृक्ष तोडण्यात न आल्याचा अहवाल मनपा अभियंत्यांनी सादर केला होता. मात्र,‘गुगल अर्थ’ वर बाजार समितीच्या तोडण्यात आलेल्या भिंतीची पाहणी केली असता, या ठिकाणी भिंतीलगत वृक्षांची लागवड केली गेली असल्याचे दिसून येत आहे.यामुळे मनपा अभियंत्यांचा अहवाल खोटा ठरत असून, मनपा प्रशासन काय कारवाई करणार ? याकडे लक्ष लागले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीची संरक्षक भिंत तोडण्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असून, दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. बाजार समितीची भिंत तोडताना या ठिकाणी लावण्यात आलेले १२८ वृक्ष देखील विकासकाने भिंतीसोबतच रात्रीच्या वेळेस तोडले असल्याचा आरोप माजी सभापती लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांच्यासह व्यापाऱ्यांनी केला होता. सामान्यांवर कारवाई करणाºया मनपा प्रशासनाकडून बाजार समिती प्रशासनावर कारवाई होईल का ? याकडे लक्ष लागले आहे. तसेचया प्रकरणी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी देखील वृक्ष तोडणाºयावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली आहे.पंचनाम्यावर स्वाक्षरी देण्यास कोणीही तयार होईनामनपा अभियंत्यांनी गुरुवारी पंचनामा केल्यानंतर त्या ठिकाणी त्रयस्थ व्यक्तीची पंच म्हणून स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र, पंचनाम्यावर बाजार समितीमधील कोणताही कर्मचारी, व्यापारी किंवा हमाल,माथाडी देखील स्वाक्षरी करण्यास तयार झाला नसल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे पंचनाम्याची प्रक्रिया पुर्ण होवू शकलेली नाही.दरम्यान,अभियंत्यांचा अहवालात या ठिकाणी वृक्ष असल्याचे नक्की झाले आहे.मात्र,आता हे रोपटे होते की वृक्ष याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. वृक्षअधिनियमात कोणत्या प्रकारच्या रोपट्यांना वृक्ष म्हणावे की म्हणू नये याबाबत कोणताही उल्लेख नाही.त्यामुळे मनपा प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.रस्त्याच्या खाली दाबण्यात आले आहेत वृक्ष ?‘गुगल अर्थ’ वर आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी देखील तपासणी केली असता, संरक्षक भिंतीच्या वृक्ष असल्याचे दिसत आहे.दरम्यान,मनपा आयुक्तांनी अभियंत्यांना पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी अभियंत्यांनी बाजार समितीच्या ठिकाणी जावून पुन्हा पाहणी केली.भिंत तोडण्यात आल्याच्या ठिकाणी पुर्णपणे सपाटीकरण केलेले दिसून येत आहे. अभियंत्यांच्या मते या ठिकाणी वृक्ष होते मात्र ते रस्त्याचा खाली दाबण्यात आल्याचा अहवाल अभियंत्यांनी तयार केला आहे.
अभियंत्यांना न दिसलेले वृक्ष ‘गुगल अर्थ’ ने शोधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:46 AM