शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

धान्याचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:02 AM

विश्लेषण

विजयकुमार सैतवालजळगाव : रावेर व यावल तालुक्यातील धान्य घोटाळ््याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपासणी झाली, अहवाल आला तरीदेखील मात्र एका गोदामातील धान्याबाबत कोणीच जबाबदारी घेत नसल्याने या धान्याचे काय गौडबंगाल आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.यावल- रावेर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानावरील धान्याचा काळा बाजार होत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने अचानकपणे छापा टाकून गोदामातील धान्यसाठा जप्त केला होता. या प्रकरणात पुरवठा निरीक्षकांच्या फिर्यादीवरून सुनील उर्फ बाळू नेवे, विलास चौधरी व योगेश पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यावल आणि रावेर तालुक्यातील रेशन दुकानांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांकडून तपासणी करण्यात आली. यात यावल तालुक्यातील १०० तर रावेर तालुक्यातील ५१ रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी यावल तालुक्यातील २४ तर रावेर तालुक्यातील १० असे एकूण ३४ रेशन दुकानांचे व्यवहार संशयास्पद आढळून आले होते.या प्रकरणी ९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यामध्ये रावेर येथील बºहाणपूर रस्त्यांवरील (गोदाम क्रमांक २) व जीआयसी कॉलनीमधील (गोदाम क्रमांक ३) मधील साठ्याच्या पावत्या व इतर कागदपत्रे संबंधितांनी सादर केले. या मध्ये गोदाम क्र.२ मध्ये गहू व हरभरा तर तिसऱ्या गोदाममध्ये मका साठवलेला होता. मात्र गहू, तांदूळ व साखरेचा साठा आढळून आलेल्या पहिल्या गोदाममध्ये असलेल्या साठ्याची जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. त्यामुळे या तीनही गोदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले.जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी यावल तालुक्यातील ८ तर रावेर तालुक्यातील ६ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले व त्यानुसार या १४ दुकानांचे परवाने तडकाफडकी रद्द केले होते. तसेच त्यापूर्वीच दोन दुकानांचे परवाने रद्द झाल्याने ही संख्या आता १६वर पोहचली.कारवाई होताना दिसत असली तरी एका गोदामातील धान्याची जबाबदारी कोणी घेत नसल्याने या गौडबंगालाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

धान्याचे गौडबंगालविश्लेषणविजयकुमार सैतवालजळगाव : रावेर व यावल तालुक्यातील धान्य घोटाळ््याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तपासणी झाली, अहवाल आला तरीदेखील मात्र एका गोदामातील धान्याबाबत कोणीच जबाबदारी घेत नसल्याने या धान्याचे काय गौडबंगाल आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.यावल- रावेर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानावरील धान्याचा काळा बाजार होत असल्याच्या माहितीवरून जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने अचानकपणे छापा टाकून गोदामातील धान्यसाठा जप्त केला होता. या प्रकरणात पुरवठा निरीक्षकांच्या फिर्यादीवरून सुनील उर्फ बाळू नेवे, विलास चौधरी व योगेश पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर यावल आणि रावेर तालुक्यातील रेशन दुकानांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांकडून तपासणी करण्यात आली. यात यावल तालुक्यातील १०० तर रावेर तालुक्यातील ५१ रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी यावल तालुक्यातील २४ तर रावेर तालुक्यातील १० असे एकूण ३४ रेशन दुकानांचे व्यवहार संशयास्पद आढळून आले होते.या प्रकरणी ९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. यामध्ये रावेर येथील बºहाणपूर रस्त्यांवरील (गोदाम क्रमांक २) व जीआयसी कॉलनीमधील (गोदाम क्रमांक ३) मधील साठ्याच्या पावत्या व इतर कागदपत्रे संबंधितांनी सादर केले. या मध्ये गोदाम क्र.२ मध्ये गहू व हरभरा तर तिसऱ्या गोदाममध्ये मका साठवलेला होता. मात्र गहू, तांदूळ व साखरेचा साठा आढळून आलेल्या पहिल्या गोदाममध्ये असलेल्या साठ्याची जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. त्यामुळे या तीनही गोदामांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले.जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी यावल तालुक्यातील ८ तर रावेर तालुक्यातील ६ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले व त्यानुसार या १४ दुकानांचे परवाने तडकाफडकी रद्द केले होते. तसेच त्यापूर्वीच दोन दुकानांचे परवाने रद्द झाल्याने ही संख्या आता १६वर पोहचली.कारवाई होताना दिसत असली तरी एका गोदामातील धान्याची जबाबदारी कोणी घेत नसल्याने या गौडबंगालाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव