शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची शुल्क वाढ रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:09 AM

जळगाव : गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात पालक व विद्यार्थी होरपळत असताना मागील वर्षाचे शैक्षणिक ...

जळगाव : गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात पालक व विद्यार्थी होरपळत असताना मागील वर्षाचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे हा प्रश्न पालकांसमोर आहे. त्यातच स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने १० टक्के शैक्षणिक शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे. हे अन्यायकारक असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान होऊ शकते. दरम्यान ही शुल्क वाढ रद्द करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्राचार्य प्रा.डॉ. आर.डी. कोकाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अखिल भाररतीय विद्यार्थी परिषदेतर्फे कुलगुरूंना देण्यात आलेल्या निवेदनात विद्यार्थी हिताच्या विविध मागण्यात करण्यात आल्या आहे. यात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी लागू करण्यात आलेली दहा टक्के अन्यायकारक शुल्कवाढ रद्द करण्यात यावी, येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश शुल्क ३० टक्के सरसकट कमी करावे आणि फीच्या किमान १० टक्के रक्कमेवर चालू शैक्षणिक वर्षाला विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क ३ टप्प्या ऐवजी ६ टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात यावी. मागील सत्रातील १५ मार्चपासून लायब्ररी फी, जिमखाना फी, लॅबोरेटरी फी, हॉस्टेल फी, सोशल गॅदरिंग फी या सर्व व इतर फी विद्यार्थ्यांना परत देण्यात यावी आणि जो पर्यंत महाविद्यालय सुरू होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांकडून ही फी घेऊ नये, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना अद्यापही मिळाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन त्यांची शिष्यवृत्ती त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावी अशा स्वरूपाच्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. यावेळी महानगरमंत्री रितेश चौधरी, पवन भोई, हर्षल तांबट, संकेत सोनवणे, आदेश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव