जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ योजना जाहीर झाल्यानंतर दीड वर्षानंतरही सुरूच आहे. अद्यापही सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. जिल्ह्यातील चार हजार ९१९ शेतकºयांसाठी १७ कोटी ४८ लाख १३ हजार ५०४ रुपयांची कर्जमाफी मंजूर झाल्याची ११वी हिरवी यादी दोन-तीन दिवसांपूर्वी जाहीर होताच सोमवारी ती तातडीने रद्दही करण्यात आली आहे.जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाकडून (महाआॅनलाईनकडून) ही यादी येत असते. त्यांच्याकडून यादी रद्द झाल्याबाबत अद्याप कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे याबाबत सध्यातरी काही सांगता येणार नाही, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.तालुकानिहाय विभाजन सुरू असतानाच यादी रद्दआतापर्यंत १० हिरव्या याद्या (ग्रीन लिस्ट) जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा बँकेला प्राप्त झाल्या असून त्यातील शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. यादी प्राप्त झाली की तिची प्रिंट जिल्हा बँक काढून ती तालुकानिहाय विभागून लेखापरीक्षकांना देतात. ते खातेनिहाय तपासणी करून ती यादी बँकेला देतात. त्यानुसार बँक संबंधित शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग करते. त्यानुसार ११ वी हिरवी यादी दोन-तीन दिवसांपूर्वीच प्राप्त झाली होती. जिल्हा बँकेकडून त्याची प्रिंट काढून तालुकानिहाय विभाजन सुरू असतानाच ती यादी रद्द झाली.
जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीची ११ वी हिरवी यादी जाहीर होताच शासनाकडून रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 1:09 PM
याद्यांचा घोळ दीड वर्षांपासून सुरुच
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनायाद्यांवरील खर्च पाण्यात