यावेळी शेतकरी सरकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते. १८ रोजी दुपारी १२ वाजता चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊनमध्ये ज्वारी व मक्याचे पूजन करण्यात आले. मका १ हजार ८५० रुपये व ज्वारी २ हजार ६२० रुपये दराने भरडधान्य म्हणून शासन खरेदी करण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेनेचे राजेंद्र पाटील, आबा देशमुख, माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, महिला तालुकाप्रमुख मंगला पाटील, नगरसेवक राजाराम पाटील, किशोर चौधरी, भैया पवार, गणेश पाटील, सुनील पाटील, प्रताप पाटील, दीपक चौधरी, सुनील पाटील, विजय देशमुख, नायब तहसीलदार राजपूत आदी मान्यवरांचे स्वागत व सत्कार शेतकी संघाचे प्रेसिडेंट दुर्गादास पाटील, व्हाइस प्रेसिडेंट पंडित धनगर, संचालक शेखर पाटील, साहेबराव पाटील, देवीदास धनगर, व्यवस्थापक राहुल पाटील, बाबूलाल शिंपी, संजय कोळी, सुभाष पाटील, शिवसेनेच्या मंगला पाटील, सुनील पाटील, नरेश महाजन, अमोल पाटील, छोटू वारडे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार पत्रकार रमेश जे. पाटील यांनी मानले.