आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.३- जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.)च्या विद्यमान अध्यक्षांची वर्षभराची मुदत आॅक्टोबरमध्ये संपत असल्याने अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांकडून फिल्डींग लावण्यास प्रारंभ झाला आहे. सहकार गटाकडे बहुमत असूनही पहिल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आयाराम-गयाराम सदस्यांमुळे अडचण निर्माण झाली होती. मात्र ऐनवेळी फोडाफोड करीत सहकार गटाचा अध्यक्ष झाला होता. त्यामुळे या निवडणुकीत आयाराम-गयाराम पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे. सध्या सर्व २१ सदस्य सहकार गटात असल्याने विरोधी लोकशाही व लोकमान्य पॅनलकडूनही हालचाली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिघांची नावे चर्चेत अध्यक्षपदासाठी सहकार गटाचे गटनेते उदय पाटील, तसेच सुनील निंबा पाटील, सुभाष जाधव आदींची नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी आणखीही नावे समोर येण्याची शक्यता आहे. मात्र अध्यक्षपदाबाबतचा निर्णय सहकारगटाचे नेते बी.बी. पाटील हेच घेणार आहेत. दरम्यान कार्यकारी मंडळाची बैठक शनिवार, दि.९ रोजी होत आहे. त्यातही या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
ग.स. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची फिल्डींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 7:02 PM
तिघांची नावे चर्चेत: सहकार गटाकडून उमेदवाराबाबत चाचपणी सुरू
ठळक मुद्देविद्यमान अध्यक्षांची वर्षभराची मुदत आॅक्टोबरमध्ये संपणार इच्छुकांकडून फिल्डींग आयाराम-गयाराम सदस्यांमुळे अडचण