यावल, जि.जळगाव : जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या नियंत्रणाखाली तालुक्यातील कोरपावली विकासोच्या माध्यमातून तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथील गोदामावर सोमवारपासून ज्वारी खरेदी केंद्रास प्रारंभ झाला. तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. ३१ डिसेंबरपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे.आॅनलाइन नाव नोंदलेले प्रथम शेतकरी लक्ष्मण नेहेते यांच्या ज्वारीची खरेदी करून खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तहसीलदार कुंवर यांच्या हस्ते शेतकरी नेहेते यांचा श्रीफळ देवून गौरव करण्यात आला. महिनाभरापासून गोदामाअभावी भरड धान्याची खरेदी रखडलेली होती. अखेर सांगवी बुद्रूक येथील विविध कार्यकारी सोसायटीकडून गोदाम उपलब्ध झाल्याने सोमवारी सुरू झाले. सकाळी एका छोटे खानी कार्यक्रमात तहसिलदार जितेंद्र कुवर यांच्या हस्ते काटा पुजन करण्यात आल. तालुक्यातील सुमारे ८० शेतक-यांनी एक हजार क्विंटल ज्वारीची आॅनलाईन नोंदणी केली असल्याचे अभिकर्ता ेगउे यांनी सांगीतले.या प्रसंगी कोरपावली विकास सोसायटी या अभीकर्ता विकासोचे चेअरमन राकेश फेगडे, पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन आर. एस. भंगाळे, आर.बी. माळी, संस्थेचे सचीव मुकुंदा तायडे व शेतकरी या प्रसंगी उपस्थित होते
यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 5:16 PM
सांगवी बुद्रूक येथील गोदामावर ज्वारी खरेदी केंद्रास प्रारंभ झाला.
ठळक मुद्देमहिनाभरापासून गोदामाअभावी भरड धान्याची खरेदी रखडली होतीकोरपावली वि.का.संस्थेच्या माध्यमातून खरेदी३१ डिसेंबरपर्यंत राहणार खरेदी सुरू