पहूर, ता. जामनेर : वाकडी, ता. जामनेर येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे बेपत्ता झाल्याप्रकरणात मंगळवारी अटकेतील सरंपच पती नामदार तडवी व विनोद देशमुख यांना वाकडी धरणाच्या भिंतीजवळ नेऊन चौकशी करण्यात आली. त्या ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. त्याचा पंचनामा करण्यात आला असून दोघांच्या घरी जाऊन काही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तर माजी सरंपच चंद्रशेखर वाणी यांच्या घरी पोलीस गेले असता घराला कुलूप लावल्याचे दिसून आले आहे.पोलीस पाटलाकडून धागेदोरेपाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील स्थानिक पोलीस पाटलाला या घटनेची कुणकुण लागल्याची माहिती समोर येत असून त्यांनी पिंपळगाव हरेश्वरचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना माहिती दिली होती. त्यावरून पोलिसांच्या हालचाली वाढल्या. त्यात २४रोजी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह सर्व ताफा पिंप्री धरणावर गेला होता. तेथे मानवी शरीराचे अवशेष आडळून आले होते. त्यानंतर आता मंगळवारी पिंप्री परिसरात संपूर्ण जंगल पिंजून काढले. मुख्य आरोपी याच परिसरातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, तपासादरम्यान विनोदच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याचेही निष्पन्न झाले आहे.घटनास्थळी गर्दीपिंप्री धरणाच्या भींतीजवळ अटकेतील आरोपींना पोलिसांनी आणल्यानंतर चांदणे परिवारातील विनोदचे भाऊ, मुलगा उपस्थित होते. या सोबतच मातंग समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंदोलनाचा ईशाराया प्रकरणात गुन्हा दाखल असलेले माजी सरंपच चंद्रशेखर वाणी यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी आंदोलन करण्याचा इशारा डीवाएसपी केशवराव पातोंड यांना ग्रामस्थांनी दिला. मात्र पातोंड यांनी मातंग समाजाच्या भावना जाणून असून एक दोन दिवस थांबा तपास लागेल, असे सांगत आंदोलन न करण्याचे आवाहन केले.दुचाकी घेतली ताब्यातविनोद चांदणे यांची दुचाकी (एमएच, १९ बीसी ७०१५) वाकडीतील त्यांच्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मंगळवारी संध्याकाळी वाकडीतील सात ते आठ ग्रामस्थांना पहूर पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांची चौकशी व विचारपूस करण्यात आली. त्यांच्या सोबत पोलीस पाटील घन:श्याम पाटील होते.‘पप्पा कधी येणार.....’विनोद चांदणे आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांचा मुलगा तेजस हा ‘पप्पा कधी येणार.....’ अशी विचारणा राजेंद्र चांदणे यांच्याकडे करीत आहे. त्यामुळे मुलाचे हे शब्द एकून सर्वांचाच कंठ दाटून येत आहे. विनोद घरापासून दूर गेल्याने तो कधी परतणार याकडे परिवाराच्या नजरा लागल्या असून कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
ग्रा.पं. सदस्य बेपत्ता प्रकरण : वाकडी धरणाच्या भिंतीजवळ आढळले रक्ताचे निशाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:53 PM