जळगाव : तालुका पुरवठा विभागाच्या गोदामातून ३१ दुकानांना ८ जुलैअखेर धान्य वाटप करण्यात आले आहे. त्यासोबतच १६० दुकानदारांनी धान्याचे पैसे दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या गोदामात धान्याचा साठा मोठ्या प्रमाणात असून, बाहेर ट्रकच्या रांगा लागल्याचे वृत्त समोर आले होते. त्यात ५ जुलैपर्यंत शासकीय गोदामातून फक्त चारच दुकानांना माल पोहोचला होता. आता ८ जुलैअखेर या गोदामातून ३१ दुकानांना धान्य पोहोचविण्यात आले आहे.
बुधवारी जिल्हा पुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार जळगाव तालुक्यात फक्त १.९४ टक्केच धान्य दुकानदारांना मिळाले होते. इतर तालुक्यात जुलै महिन्याचे धान्य वितरण वेगात होत होते. मात्र, जळगाव तालुक्यात धान्य वितरण कमी होत असल्याने नागरिकांनादेखील उशिराने मिळण्याची शक्यता होती. मात्र, आता दोन दिवसांत दुकानदारांना धान्य वितरण होत असल्याचे समोर आले आहे.