मुक्ताईनगर : तूर खरेदी केंद्राअभावी शेतक:यांची होणारी गैरसोय पाहता खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर नाफेडचे तूर खरेदी केंद्र बोदवडसह मुक्ताईनगरात रविवारपासून सुरू करण्यात आल्याने शेतक:यांना मोठा दिलासा मिळाला आह़े दोन्ही केंद्रासाठी पाच हजार बारदान उपलब्ध करून देण्यात आले असून 28 दिवसांच्या प्रतीक्षेअंती तूर उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.मुक्ताईनगरला खासदार खडसेंच्या हस्ते खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. तालुक्यात चांगदेव येथे राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या एस.एफ.ए.सी.या शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने संत चांगदेव तापी-पूर्णा शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तीन आठवडय़ात या ठिकाणी दोन हजार क्विंटल तर खरेदी झाली मात्र एस.एफ.ए.सी.या मुख्य कंपनीच्या वतीने येथे 23 फेब्रुवारीपासून बारदानच पुरविण्यात आले नसल्याने हे तूर खरेदी केंद्र बंद पडल़े अनेक दिवस येथे शेतक:यांची वाहने उभी राहिली, मात्र बारदानअभावी खरेदी शक्य नसल्याचे चांगदेव येथील शेतकरी उत्पादक कंपनीने शेतक:यांना सांगितल्याने येथून शेतकरी परतले. दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांनी केंद्र शासनाकडे व राज्यातील पणनमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकरी उत्पादक कंपन्यांऐवजी थेट नाफेडची खरेदी येथे सुरू करण्यात यश मिळविले. रविवारी बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शासन धोरणानुसार एकाच तालुक्यात शेतकरी उत्पादक संस्था आणि नाफेड अशा दोन स्वतंत्र तूर खरेदी केंद्र शक्य नव्हते परंतु तूर खरेदीसाठी यंत्रणा राबवणारी एस.एफ.ए.सी. या मुख्य कंपनीमार्फत बारदान नसल्याने शेतक:यांना वा:यावर सोडता येणार नाही. या मुद्यावर प्रतिकूल परिस्थितीत माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने येथे नाफेडची खरेदी सुरू झाली आहे. मुक्ताईनगर, बोदवड आणि चोपडा या तीन ठिकाणी ही खरेदी केंद्र सुरू राहणार आहेत. दरम्यान, शेतक:यांनी तूर्त वाहने न आणता नावनोंदणी करावी, यात जवळपास 97 शेतक:यांनी त्याची तूर बाजार समितीकडे नोंदवल्याचे सभापती निवृत्ती पाटील म्हणाल़े (वार्ताहर)मुक्ताईनगरात शुभारंभाला 72 वाहने4मुक्ताईनगरला सकाळी 11 च्या सुमारास खरेदी केंद्र शुभारंभ पार पडले. प्रसंगी जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, योगेश कोलते, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पं.स.सभापती शुभांगी भोलाणे, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, भागवत टिकारे, जि.प.सदस्य वैशाली तायडे, वनिता गवळे, नीलेश पाटील, जयपाल बोदडे, पं.स.उपसभापती प्रल्हाद जंगले, सुवर्णा साळुंखे आदी उपस्थित होते. शुभारंभालाच मुक्ताईनगर येथील उपबाजारात 72 ट्रॅक्टर व अन्य वाहने केंद्रावर हजर झाली. उद्यापासून वाहनातील तूर मोजली जाणार आहे तर बोदवड बाजार समिती प्रांगणात 100 ट्रॅक्टर व बैलगाडीसह अन्य वाहने दाखल झाली. बाजार समिती आवारातील वाहनांची संख्या लक्षात घेता आम्ही वाहने आणण्याऐवजी रांगेतील वाहने मोजणी झाल्यानंतरच पुढची वाहने आवारात आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बोदवड- कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडतर्फे तूर खरेदीला 19 रोजीपासून खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते काटा पूजनाने सुरुवात करण्यात आली. प्रसंगी बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, सुभाष पाटील, शांताराम चौधरी, भीमराव पाटील, सुरेंद्र पाटील, अनिल वराडे, अनिल पाटील, तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, कैलास चौधरी, गणेश पाटील यांची उपस्थिती होती़ शेतक:यांनी आपला माल स्वच्छ करून तसेच सोबत 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबूक सोबत आणावे, असे आवाहन बाजार समिती सचिव राजेश काळबैले यांनी केले आहे. (वार्ताहर)
महिन्यानंतर आले बारदान, वाहनांच्या रांगा
By admin | Published: March 20, 2017 12:28 AM