आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र तायडे व महिला सदस्यांमध्ये वाद झाला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दीपनगर येथे पोटनिवडणूक होत असून सकाळी तायडे व महिला सदस्यांमध्ये वाद झाला. त्या वेळी सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तायडे यांच्यासह तीन जणांना ताब्यात घेतले.दरम्यान, जिल्ह्यातील ५५ ग्रा.पंच्या सार्वत्रिक व २५ ग्रा.पं.च्या पोटनिवडणूक अशा ८० ग्रा.पं.साठी मतदान होत आहेत. मतदानास सकाळी ७.३० वाजेपासून सुरूवात झाली आहे. मतमोजणी बुधवार, २८ रोजी सकाळी १० वाजेपासून त्या-त्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी होणार आहे.जिल्ह्यातील ५५ ग्रा.पं.च्या सरपंच व सदस्यांचा कालावधी संपत असल्याने त्यासाठी मतदान होत आहे. त्यासोबतच २५ ग्रा.पं.च्या रिक्त जागांसाठीही पोटनिवडणूक होत आहे. ५५ ग्रा.पं.च्या सरपंचपदासह सदस्यांच्या एकूण ५८० जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. माघारीनंतर सरपंचपदासह सदस्यांचे एकूण १७९ जागा बिनविरोध झाल्याने ३९३ जागांसाठी मतदान होत आहे. तर १३२ ग्रा.पं.च्या सरपंच व सदस्यपदाच्या १८८ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.
दीपनगर येथे ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान वाद, तिघेजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:01 PM
काही काळ तणावाचे वातावरण
ठळक मुद्देसकाळी ७.३० वाजेपासून मतदानास सुरूवात झालीजिल्ह्यातील ५५ ग्रा.पं.च्या सरपंच व सदस्यांचा कालावधी संपत असल्याने मतदान