यावल, जि.जळगाव : बनावट जात प्रमाणपत्र दिल्याने बोराळे, ता.यावल येथील ग्राम पंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यावल तालुक्यातील रहिवासी असलेल्या संजीव रज्जूसिंग राजपूत या सदस्याने भडगाव तहसीलमधून जात प्रमाणपत्र मिळविले आणि ते बनावट आढळून आले आहे. हा निकाल येथील न्यायाधिश डी. जे. जगताप यांनी शुक्रवारी दिला आहे. या निर्णयाने तालुक्यात खळबळ उडाली आहे.यावल तालुक्यातील बोराळे येथे डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीनमधून ना.मा.प्रवर्गातील राखीव जागेवर संजीव रज्जूसिंग राजपूत हे निवडून आले होते. राजपूत यांना ७४, तर प्रती स्पर्धी सुनील पंडित यांना ७१ मते मिळाली होती. प्रतीस्पर्धी सुनील ज्ञानेश्वर पंडित यांनी निकालानंतर राजपूत यांच्याविरुद्ध येथील न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. न्यायालयाने प्रमाणपत्राची पडताळणी केली असता राजपूत यांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिसून आले म्हणून ही निवड रद्द केली आहे. सुनील पंडित यांच्याकडून राजेश गडे, तर राजपूत यांच्याकडून अजित वाघ यांनी काम पाहिले.तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगीतले की, संजीव राजपूत यांची न्यायालयाने निवड रद्द ठरवली आहे. पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाºयांकडे निकालाची प्रत पाठवली आहे.
बोराळे येथे निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्याचे ग्रा.पं. सदस्यत्व रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 6:04 PM
बनावट जात प्रमाणपत्र दिल्याने बोराळे, ता.यावल येथील ग्राम पंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यावल तालुक्यातील रहिवासी असलेल्या संजीव रज्जूसिंग राजपूत या सदस्याने भडगाव तहसीलमधून जात प्रमाणपत्र मिळविले आणि ते बनावट आढळून आले आहे.
ठळक मुद्देराजपूत भामटा या जातीच्या दाखल्यावर ही निवडणूक लढवली होती.उमेदवारी अर्जासोबतचा जातीचा दाखला बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने ही निवड रद्द करण्यात आली आहे.