मनोज जोशीपहूर, ता. जामनेर - वाकडी, ता. जामनेर येथील बेपत्ता झालेले ग्रामपंचायत सदस्य तथा आरटीआय कार्यकर्ता विनोद लक्ष्मण चांदणे (३७) हे दहा दिवसांनंतर मृतावस्थेत आढळून आले असून त्यांचा राजकीय वैमनस्यातून खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या घटनेने वाकडी गाव सुन्न झाले असून १० महिन्यांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या घटनेने गावात तणावपूर्ण शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त आहे.अखेर खुनाचा गुन्हा दाखलवाकडीतील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे हे १९ मार्च रोजी वाकडी धरणाच्या भिंतीपासून संशयास्पदरित्या बेपत्ता झाले होते. या प्रकरणी प्रथम बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर विनोद यांचा घातपात केला असावा, त्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी तक्रार विजय चांदणे यांनी दिली होती. त्यानंतर माजी सरंपच चंद्रशेखर वाणी, सरंपच पती नामदार तडवी, विनोद देशमुख रा, वाकडी व महेंद्र राजपूत, रा. शेळगाव यांच्यावर संशय व्यक्त केला होता. राजेंद्र लक्ष्मण चांदणे यांच्या फिर्यादीवरून शनिवार, २३ रोजी वरील चौघांविरूध्द अपहरण, कटकारस्थान, अट्रासिटी प्रमाणे गुन्हा दाखल करून चंद्रशेखर वाणी वगळता तीन जणांना अटक करण्यात आले होते. त्यानंतर मोहाडी येथे विहिरीत आढळून आलेला मृतदेह विनोद यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विनोद चांंदणे यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने वरील चौघांविरूध्द २८ रोजी पहूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.रात्रीपर्यंत पोलीस ठाण मांडूनया घटनेने पोलिसांसमोर आव्हान ठेवले होते. त्यासाठी त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवाय. एसपी केशवराव पातोंड, डीवाय. एसपी ईश्वर कातकडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील हे गेल्या आठवड्यापासून शोध घेत होते. अखेर बुधवारी संध्याकाळी मोहाडी येथे विहिरीत एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संपूर्ण पोलीस दल घटनास्थळी पोहचले व रात्री बारा वाजेपर्यंत ठाण मांडून होते.गुरुवारी सकाळी अखेर मृतदेहाची ओळख पटली. तरीदेखील मनात शंका असल्याने विनोदच्या भावांनी भ्रमध्वनीवरून बनियानचे छायाचित्र मागविले. त्या वेळी मृतदेहावरील व घरची बनियान एकच कंपनीचे असल्याचे उघड झाले.वाकडीत पोलीस बंदोबस्तविनोदचा मृतदेह सापडल्याचे समजताच गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावात तगडा बंदोबस्त ठेवला. जून २०१८मध्ये मांतग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेला वर्षही होत नाही, तोच पुन्हा गावातील मातंग समाजाच्या ग्रामपंचायत सदस्याचा खून झाल्याने समाजबांधवांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून या घटनेमुळे वाकडी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.वाकडी धरण ते मोहाडी धरणवाकडी धरणाच्या भिंतीपासून मोहाडी गावाजवळील धरणाचे जवळपास ६० कि.मी. अंतर असून विनोदच्या खुनाला राजकीय किनार असल्याचे पोलीस तपासात समोर येत असून अंत्यत क्रुरपणे करण्यात आलेला हा खून आणखी कोणत्या कारणासाठी झाला आहे, याचा शोध घेतला जात आहे. खून कोठे व केव्हा केला असेल असे प्रश्न निर्माण झाले असून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एवढ्या लांब अंतरावरील हीच विहिर निवडण्याचे कारण काय असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. एका जणाने हा खून केला नसून चार ते पाच जणांनी षडयंत्र रचून अपहरण करीत खून केला असावा व चारचाकी वाहनातून मृतदेहाची विल्हेवाट निर्जन स्थळ पाहून लावण्यात आली असावी, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. घटनेत अपहरण स्थळ वाकडी धरण, मृतदेहाचे अवशेष सापडले प्रिंपी धरण व विनोदचा मृतदेह आढळले ते मोहाडी धरणाजवळील विहीर, असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर आहे.प्रिंपी धरणावरील अवशेषांचे काय ?विनोदच्या शोधादरम्यान प्रिंपी धरणात सापडलेले मृतदेहाचे अवशेष कोणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच परीसरातील मुख्य आरोपी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून पाच जणांनी विनोदचा घातपात केल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र पाचव्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.दहा दिवस उलटूनही विनोदचा तपास लागत नव्हता. पोलीस तपास करीत होते. मात्र बुधवारी चांदणे परिवाराचा संयम सुटला आणि त्यांनी पहूर पोलीस स्टेशनमध्ये धारेवर धरले होते.वाढता हस्तक्षेप डोकेदुखी ठरत असल्याने काढला काटाविनोद हे एकमेव मातंग समाजाचे ग्रामपंचायत सदस्य होते. यासोबतच ते आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करीत होते. वाकडी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचाराला त्यांचा विरोध होता तसेच शासकीय निधीची माहिती ग्रामपंचायतकडून माहिती अधिकारात घेत असे. त्यांचा वाढता हस्तक्षेप डोकेदुखी ठरत चालला होता. यासाठी त्याला जिवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली होती, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या पूर्वी दोन वेळा त्यांना मारहाणही झाली होती. या घटना क्रमावरून त्यांचे अपहरण करून खून केला, असे त्यांचा भाऊ राजेंद्र चांदणे यांनी सांगितले.
अखेर माजी सरपंचाला अटकया प्रकरणी माजी सरंपच चंद्रशेखर वाणी याला पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे व अनिल देवरे यांनी पंढरपूर येथून गुरुवारी ताब्यात घेत पहूर पोलीस स्टेशनमध्ये आणले. संध्याकाळी त्यास अटक करण्यात आली. वाणी याला अटक करण्याची प्रमुख मागणी चांदणे परीवाराने केलेली होती. यासाठी पहूर पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी ठिय्या आंदोलनदेखील करण्यात आले होते.विनोद चांदणे यांचा खून झाला असून चौघांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात इतर आरोपींचाही शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल.- ईश्वर कातकडे, डीवाय.एसपी पाचोरा विभाग