लोकमत आॅनलाईन जळगाव, दि.१- नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील १४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवार १ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी ४ वाजेपासूनच आचारसंहिता लागू झाली असून १४ आॅक्टोबर २०१७ रोजी मतदान होणार आहे. राज्यातील ग्रा.पं. निवडणुकांचा हा दुसरा टप्पा असून आणखी तिसरा टप्पाही होणार आहे. जिल्ह्यातील २४१ ग्रा.पं.चा कार्यकाळ आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपत असून त्या ग्रा.पं.च्या निवडणुकांची तयारी शासन व जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली आहे. त्यापैकी डिसेंबर २०१७ अखेर मुदत संपणाºया जिल्ह्यातील १४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात जळगाव तालुक्यातील १२, जामनेर १२, एरंडोल ६, धरणगाव ६, भुसावळ ६, मुक्ताईनगर २, यावल ८, रावेर २३, बोदवड ५, अमळनेर २५, पारोळा ९, चोपडा ५, भडगाव ६, चाळीसगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक-१४ सप्टेंबर नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ -२२ ते २९ सप्टेंबर सकाळी ११ ते दुपारी ४.३० यावेळात. (दि.२३ व २४ हे सार्वजनिक सुटीचे दिवस सोडून) छाननी- ३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपासून. नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत- ५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी- ५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेनंतर. आवश्यक असल्यास मतदान-१४ आॅक्टोबर (शनिवार)रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत. मतमोजणी- दि.१६ आॅक्टोबर रोजी. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकांचा निकाल प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक- दि.१७ आॅक्टोबर २०१७.
जळगाव जिल्ह्यातील १४२ ग्रा.पं.साठी १४ आॅक्टोबरला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 8:12 PM
निवडणूक कार्यक्रम जाहीर: आचारसंहिता लागू
ठळक मुद्देशुक्रवार १ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासूनच आचारसंहिता लागूग्रा.पं. निवडणुकांचा हा दुसरा टप्पा१६ आॅक्टोबर रोजी होणार मतमोजणी