आॅनलाईन लोकमतपाळधी, ता.जामनेर,दि.२८ : रेशनदुकानाच्या यादीत घोळ करून गरजू लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप संतप्त महिलांसह नागरिकांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर ग्रामसभेत गुरुवारी केला. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तणावाचे वातावरण होऊन गोंधळ उडाला. यादरम्यान सरपंचांनी वाढीव यादीसह श्रीमंतांचे नावे रद्द करण्याचे जाहीर करीत सभा बरखास्त केली. त्यानंतर संतप्त महिलांनी रास्तारोको आंदोलन केले.रेशनधान्य वाटप, लाभार्थ्यांची मुळ यादी व वाढीव यादीचे वाचन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी दहा वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी सरपंच डिगंबर माळी, ग्रामसेवक आर.जी.पवार, सुभाष परदेशी, योगेश पाटील, अमित पाटील, विठ्ठल पाटील, आसिफ पठाण, उपसरपंच जायदा मस्तान तडवी, सचिन पाटील यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते.संतप्त महिलांनी घातला सरपंचांना घेरावसरपंच व सदस्यांनी गरजू लोकांचे नावे वगळून त्यांचे नातेवाईक व हितचिंतकांची नावे रेशनच्या यादीत दिले आहे. खºया लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याने नागरिकांनी त्याला आक्षेप घेतला. संतप्त महिलांनी सरपंचांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. वंचित लाभार्थी राधा अनिल उदमले या भूमीहीन असून पती अपंग आहेत. कार्ड असूनही त्यांना रेशनचे दीड वर्षांपासून धान्य दीड मिळत नाही.
वाढीव ४२ लाभार्थ्यांच्या यादीसह श्रीमंत लाभार्थ्यांची नावे रद्द करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. योग्य प्रक्रिया राबवून गरजू लाभार्थी निवडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविला जाईल.डिगांबर माळी, सरपंच, पाळधीश्रीमंत व राजकारण्यांच्या नातेवाईकांना रेशनकार्डचा लाभ मिळत आहे. मात्र गरजू लाभार्थी वंचित राहत आहे. गरीबांना घरोघर जावून रेशनकार्डाचे समान वाटप करा किंवा रेशनिंग बंद करा. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही जिल्हाधिकाºयांकडे जाऊन दाद मागणार आहोत.सविता प्रकाश परदेशी, वंचित लाभार्थी.