आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त रविवारी सकाळी जळगाव शहरातून ढोलताशांच्या गजरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या समाज बांधवांनी या वेळी भगवान श्री परशुराम यांचा जयघोष केला. अत्यंत शिस्तबद्धरित्या निघालेल्या या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये श्री भगवान परशुराम सेवा समिती व बहुभाषीक ब्राह्मण संघ यांच्या संयुक्तविद्यमाने रविवारी सकाळी दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाबळमधील संत गाडगेबाबा चौकापासून या रॅलीस सुरुवात झाली. या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक सतीश शर्मा, बहुभाषीक ब्राह्मण संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, अध्यक्ष संजय व्यास, श्री परशुराम सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण कुलकर्णी यांनी रॅलीस झेंडी दाखवून रॅलीस सुरुवात झाली. या वेळी मान्यवरांच्याहस्ते पूजन करण्यात आले.चौका-चौकात स्वागतसंत गाडगेबाबा चौकापासून सुरुवात झालेल्या या रॅलीमध्ये अग्रभागी उघड्या जीपवर भगवान श्री परशुराम यांची लक्षवेधी भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. संत गाडगेबाबा चौकापासून ही रॅली काव्यरत्नावली चौक, रिंग रोड, बहिणाबाई चौक, ख्याजामिया चौक, कोर्ट चौक, नेहरु चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, रथ चौक, सराफ बाजार, सुभाष चौक, दाणाबाजार, काँग्रेस भवन, जि.प. चौक या मार्गे ब्राह्मण सभा येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीदरम्यान चौका चौकात आतीषबाजी करण्यासह पुष्पवृष्टी करण्यात येऊन तसेच रांगोळ््या काढून रॅलीचे स्वागत करण्यात आले.ब्राह्मण सभा येथे रॅलीच्या समारोपानंतर सभा होऊन यामध्ये श्रीकांत खटोड, संजय व्यास, भुपेश कुलकर्णी, स्वप्नगंधा जोशी, वृषाली जोशी, सुधा खटोड, पियूष रावल, प्रवीण कुलकर्णी, विश्वनाथ जोशी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुनील याज्ञीक व पियूष रावल यांनी केले तर प्रवीण कुलकर्णी यांनी आभार मानले. या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.फेटेधारी दुचाकीस्वार व भव्य ध्वजांनी वेधले लक्षया रॅलीमध्ये हजारावर समाजबांधव सहभागी झाले होते. शहरातून प्रथमच एवढी भव्य दुचाकी रॅली निघाल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले. रॅलीमध्ये भगवे फेटे व भगव्या टोपी घातलेले व हाती भव्य भगवे ध्वज घेतलेले दुचाकीस्वार सहभागी झाले होते. यामध्ये महिला व तरुणींचा लक्षणीय सहभाग होता.
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य दुचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:01 PM
शहरवासीयांचे वेधले लक्ष
ठळक मुद्देमहिलांचा लक्षणीय सहभागभगवान श्री परशुराम यांच्या जयघोषाने दुमदुमले शहर