जळगाव : जात पंचायतीला वैतागून हतबल झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवार शहरात घडली होती. या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकणी युवतीचे आजोबा दिनकर रणजीत बागडे (रा़ दौलतनगर) यांना अटक करण्यात आली आहे.मानसी उर्फ मुस्कान आनंद बागडे ( १९, रा़ कंजरवाडा) या युवतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघड झाली होती़ मृत युवतीच्या आईच्या फिर्यार्दीवरून आजोबा दिनकर बागडे यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.जातपंचायतीत घेण्यास नकार आणि लग्नास विरोध होत असल्यामुळे मानसी बागडे या युवतीने गुरूवारी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास कंजरवाडा येथे काकाच्या घराच्याा तिसऱ्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली होती़ दरम्यान, १२ तास घरातच मृतदेह पडून राहिल्यानंतर शुक्रवारी या गोष्टीची वाच्यता झाली. आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. नंतर आजोबांकडून जातपंचायतीत तिला घेण्यास विरोध असल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची तक्रार मुंबईतील कृष्णा इंद्रेकर यांनी केली होती़ त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी चौकशीला सुरूवात केली होती़८ जणांची केली चौकशीदरम्यान, शुक्रवारी सायंकाळी मानसी हित्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले़ तर शनिवारी पोलिसांनी आजोबा दिनकर बागडे यांच्यासह सावन गागडे, दीपक माचरे, बिरजू नेतलेकर, संतोष गारूंगे, मंगल गुमाने, विजय दहीयेकर, शशिकांत बागडे यांचा समावेश होता़ यांची चौकशी करून त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले़आरोप फेटाळलादरम्यान, पैसे घेवून अंत्यसंस्कार केल्याचा आरोप जातपंचायतीच्या सदस्यांनी फेटाळून लावले आहेत. तसा जबाबही त्यांनी पोलिसांना दिला आहे.आणि रात्री उशिरा गुन्हा दाखलमयत मानसीची आई बानोबाई हिने शनिवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली़ मुलीचे लग्न समाजात लागू नये यासाठी आजोबा दिनकर बागडे यांचा विरोध होता़ त्यामुळे नैराश्यात येवून तिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ दरम्यान, आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०६ प्रमाणे दिनकर बागडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे़
युवती आत्महत्याप्रकरणी आजोबाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:56 AM