आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३० - माझे आजोबा तथा मू.जे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य (स्व.) प्रा. व्ही.जे. चौधरी हेच माझे पहिले गुरु असून मी डॉक्टर व्हावे असे ते नेहमी मला सांगत असत. त्यांच्या इच्छेनुसार मी डॉक्टर होणार असून त्यांच्या आशीर्वादामुळेच मी दहावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकले, असे प्रामाणिक मत सीबीएसई दहावी परीक्षेत चमकलेल्या ओरिआॅन सीबीएसई स्कूलची विद्यार्थिनी किमया हर्षल चौधरी हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत चमकलेली किमया चौधरी ही शहरात नसून ती उत्तराखंड येथे कुटुंबासह फिरायला गेलेली आहे. ती ऋषिकेश येथे लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शन घेत असतानाच तिला दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बातमी समजली आणि विशेष म्हणजे यात तिला ९८.४० टक्के गुण मिळाले व इतर विद्यार्थ्यांपेक्षा अव्वल आहे, हे ऐकून तिच्यासह संपूर्ण कुटुंबाला आनंद गगणात मावेनासा झाला. याच वेळी त्यांनी लक्ष्मीनारायणापुढे नसमस्तक होत आशीर्वाद घेतले व देवाचे आभार मानले.मुलीचे कौतुकमुलगी प्रथम आल्याचे समजताच उत्तराखंड येथे गेलेल्या आई कुमुदिनी चौधरी, वडील हर्षल चौधरी, आजी प्रमिला चौधरी भाऊ दानेश चौधरी यांनी खोलीवर पोहचताच मुलीला पेढा भरवून तिचे कौतूक केले.आजोबांकडून मिळाली प्रेरणाकिमया चौधरी ही मू.जे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा गीता पठणासाठी अग्रेसर राहणारे प्रा. व्ही.जे. चौधरी यांची नात आहे. प्रा. चौधरी यांचे अपघाती निधन झाले असले तरी ते सुरुवातीपासून मला अभ्यासाबाबत मार्गदर्शन करण्यासह दहावी परीक्षेत तुला चांगले यश मिळवायचे आहे, अशी सतत प्रेरणा देत असत. त्यांच्याकडून मिळालेल्या या प्रेरणेने मला स्फूर्ती मिळाली व मी हे यश मिळवू शकले असे किमयाने सांगितले.स्वयं अध्ययनावर भरपरीक्षेतील यशाबाबत किमयाने सांगितले की, मी दहावीमध्ये ‘क्लास’ला कधी गेलीच नाही. त्यापेक्षा मी स्वयं अध्ययनावर (सेल्फ स्टडी) भर दिल्याचे किमयाचे म्हणणे आहे. शेवटच्या दोन महिन्यात मी वेळापत्रक ठरविले व दररोज रात्री वेळापत्रकानुसार अभ्यास करू लागले. ज्या दिवशी वेळापत्रकातील ठरलेला अभ्यास झाला नाही तो दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत जागून त् पूर्ण करीत होते, असे किमयाने सांगितले.आई-वडील, शिक्षकांचे पाठबळआपल्या यशाचे श्रेय आजोबांना देताना किमयाने सांगितले की, यासाठी आपल्याला आई, वडील, आजी तसेच शिक्षकांचे पाठबळ मिळाले.
आजोबांच्या आशीर्वादाची ‘किमया’, सीबीएसई दहावी परीक्षेत चमकलेल्या किमया चौधरीने व्यक्त केली भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:50 PM
डॉक्टर होण्याची इच्छा
ठळक मुद्देस्वयं अध्ययनावर भरआई-वडील, शिक्षकांचे पाठबळ