एरंडोल : ( बी. एस. चौधरी) शैक्षणिक द्दष्टीने मागे असलेल्या एरंडोल तालुक्यात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करुन ज्ञानाची पणती लावण्याचे काम तत्कालीन आमदार दिगंबर शंकर पाटील उर्फ दादांनी केले. त्यांचा वसा व वारसा घेवून त्यांचे नातू अमित पाटील यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने या पणतीची ज्योत अधिक तेजोमय केली. तसेच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जिवनातील अंध:कार दूर करण्याचा प्रयत्न् दि.शं. पाटील यांनी केला. अमित यांनी हाच प्रयत्न पुढे नेऊन आपली स्वतंत्र मुद्रा समाज मनावर ठसविण्यात यश संपादन केले.सन १९७१ मध्ये एरंडोल तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ करण्यात आली. संस्थेजवळ पैसा, इमारत या बाबींचा अभाव असतांना तालुक्यातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांच्याकडून निधी उभारुन सगळयांना शिक्षण संस्थेच्या कामात सामावून घेतले. या संस्थेत पदवीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. दिगंबर पाटलांच्या इच्छेनुसार अमित यांनी सन २००६ मध्ये अध्यापक महाविद्यालय सुरु करुन अध्यापन क्षेत्राचे नवे दालन विद्यार्थ्यांना खुले करुन सामाजिक उत्तरदायीत्वाची जबाबदारी पार पाडली.महाविद्यालयात क्रीडांगण, लेडीज होस्टेल, स्विमींग पूल, इनडोअर स्टेडीयम इ. उपक्रम राबविण्यात आले. यात अमित पाटील यांचा दूरदर्शीपणा आणि सृजनशिलता गुणांचा परिचय होतो. खेडयापाडयातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून औ्द्योगिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना हा अमित पाटील यांनी आजोबांकडून घेतलेला वसा आणि कार्यकर्तृत्वाचा ठसाच आहे. शेतकºयांना बी- बियाणे, खते, माफक किंमतीत मिळावे व त्यांचे जीवनमान सुधारावे, तसेच शेतकºयांच्या मालाला जादा भाव मिळावा म्हणून तालुका शेतकी संघाच्या माध्यमातून दि.शं. पाटील यांनी केलेले काम कायम स्मरणात राहिल. दि.शं. पाटील यांनी १९६० ते १९७७ या कालावधीत सलग तीन टर्म एरंडोल तालुक्याचे आमदारपद भुषविले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे नातू अमित राजेंद्र पाटील हे राष्ट्रवादी काँगेस पक्षात महत्वाची पदे सांभाळत आहेत.दि.शं. पाटलांचा ध्यास आणि विश्वास या बळावर अमित पाटील यांनी त्यांचा वारसा व वसा सिध्द केलेला आहे. म्हणूनच त्यांनी दि. शं. पाटलांनी प्रज्वलीत केलेली ज्ञानज्योत तेवढ्याच नेटाने अमित पाटील पुढे नेत आहेत.यात अमित यांचे कर्तृत्व, नेतृत्व व कुशल प्रशासन या गुणांचे दर्शन घडून येते. त्यामुळे दि.शं. पाटील यांना मोठे दादा व अमित पाटील यांना ‘दादा’ म्हणून तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्हयात ओळखले जाते.
आजोबांच्या कर्तृत्त्वाला नातवाची जोड, ‘ज्ञानज्योत’ तेवढ्याच तडफेने पुढे नेत आहेत अमित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 3:50 PM
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरीब शेतकºयांच्या जिवनातील अंध:कार दूर करण्याचा प्रयत्न् दि.शं. पाटील यांनी केला. अमित पाटील यांनी हाच प्रयत्न पुढे नेऊन आपली स्वतंत्र मुद्रा समाज मनावर ठसविण्यात यश संपादन केले.
ठळक मुद्देखेडयापाडयातील बेरोजगारांसाठी औ्द्योगिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना महाविद्यालयात क्रीडांगण, लेडीज होस्टेल, स्विमींग पूल, इनडोअर स्टेडीयम इ. उपक्रम राबविण्यात आले आहेत.