रंगभरण स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी केला महाराजांना मानाचा मुजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांच्या कार्यालयांमध्ये शनिवारी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळांमध्ये रंगभरण, वक्तृत्व स्पर्धा घेऊन महाराजांना अभिवादन करण्यात आले. तसेच काही विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती आपल्या भाषणातून देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रगती विद्यामंदिर (२७ सीटीआर ३१)
विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचालित प्रगती विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल माहिती देण्यात आली. समाजात जगत असताना बंधुता, समानता, न्याय, समता अशा मूल्यांचा आपल्या जीवनात कशा पद्धतीने वापर करून एक आदर्श नागरिक बनावे, याविषयीचे मार्गदर्शन संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी केले. यावेळी मंगला दुनाखे, मुख्याध्यापक शोभा फेगडे, मनोज भालेराव, अनिल वाघ, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी, संध्या अट्रावलकर, सुवर्णा शिराळकर, नम्रता पवार, सारिका तडवी, अविदीप पवार, सुभाष शिरसाठ, दीपक बारी आदी उपस्थित होते.
सरस्वती विद्यामंदिर (२७ सीटीआर ३०)
सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. यात कुणाल तायडे, श्रवण खिरडकर, अनुज बत्तीसे, भावेश मिस्तरी, भाग्यश्री अहिरे, ऐश्वर्या भारी, सृष्टी बारेला, राजश्री बारेला यांनी स्पर्धेत सहभाग नाेंदविला. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रतीक्षा पाटील, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका कल्पना वसाने, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका दीपाली देवरे, सुवर्णलता अडकमोल यांची उपस्थिती होती.
ए.टी. झांबरे विद्यालय (२७ सीटीआर ३२)
केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेेचे शाळेचे मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी व उपशिक्षक बी.डी. झोपे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बहिणाबाई विद्यालय
बहिणाबाई विद्यालयात मुख्याध्यापक टी.एस. चौधरी, राम महाजन, विलास नारखडे, प्रतिभा खडके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर प्रतिभा खडसे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली.
श्रीराम माध्यमिक विद्यालय (२७ सीटीआर २५)
श्रीराम माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक दिवाकर जोशी व संस्थेचे संचालक भगवान लाडवंजारी यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले.
जिजामाता माध्यमिक विद्यालय (२७ सीटीआर २६)
न्यू जागृती मित्र मंडळ संचालित जिजामाता माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर स्काउट शिक्षक किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिनेश सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विकास तायडे यांनी, तर आभारप्रदर्शन आशा पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संजय खैरनार, कृष्णा महाले, संगीता पाटील, संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी यांनी परिश्रम घेतले.
राज प्राथमिक विद्यालय
मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालय येथे उपशिक्षिका जयश्री महाजन यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
सुजय महाजन प्राथमिक विद्यालय
सुजय महाजन विद्यालयात मुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गौरव सरोदे, रविराज बंजारा यांनी ऑनलाइन भाषणे केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील हितेश पाटील, पूजा तवटे, मुक्ता देशमुख यांनी परिश्रम घेतले.
मातोश्री जैन विद्यालय
मातोश्री जैन विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्चना धांडे, धनश्री फिरके, रोहिणी सोनवणे, लीना नारखेडे, मोहिनी चौधरी, रूपाली वानखेडे, अविनाश महाजन, नरेश कोळी, दीपक भोळे आदींनी परिश्रम घेतले.
अभिनव विद्यालय
अध्यापिका विद्यालय व अभिनव विद्यालय येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्राचार्या एस.एम. चौधरी व मुख्याध्यापक ललित नेमाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एम.ए. बोरोले, एन.व्ही. भंगाळे, एल.एस.महाजन, एन.बी.चव्हाण, सी.डी.लोहार, जे.ए.भोळे, डी.डी.पिंगळे, ज्योती इंगळे, उमेश चौधरी, प्रवीण वायकोळे आदींनी परिश्रम घेतले.
जय दुर्गा विद्यालय
जय दुर्गा विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ज्योती पाटील व मुख्याध्यापक सागर कोल्हे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बीयूएन स्कूल
बीयूएन रायसोनी स्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे मुख्याध्यापकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर नलिनी शर्मा, मनोज शिरोळे, विठ्ठल पाटील यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते सातवीसाठी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी नीलेश पाठक, मुकेश परदेशी, चित्रा चौधरी, ज्योत्स्ना पाटील आदींची उपस्थिती होती.
आर.आर. विद्यालय
आर.आर. विद्यालय येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी एन.डी. सोनवणे, विजय रोकडे, अरुण सपकाळे, वाय.जी. चौधरी, के.जे. सोनवणे, द्वारकाधीश जोशी, एन.एल. यावलकर, डी.बी. पांढरे आदींची उपस्थिती होती.
गोटूभाऊ सोनवणे विद्यालय
गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका साधना लाेखंडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सूत्रसंचालन पी.आर. कोळी यांनी केले, तर आभार बी.बी. धाडी यांनी मानले.