मनपा :
रेल्वे स्टेशनसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, आरपीआयचे अध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, चेतन सनकत, हरिश्चंद्र सोनवणे, जे. डी. भालेराव, सचिन अडकमोल, संदीप जोहरे, यशवंत मोरे, युवराज वाघ, मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे आदी नागरिक उपस्थित होते.
जिल्हा काँग्रेस कमिटी
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी शहराध्यक्ष डॉ. ए. जी. भ॑गाळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष शाम तायडे, राहुल भालेराव, अमजद पठाण, मनोज सोनवणे, छाया कोरडे, दीपक सोनवणे, जगदीश गाढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसंघर्ष मोर्चा
जळगाव : शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुरू असलेल्या लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील, सचिव सचिन धांडे, भरत कर्डिले, प्रमोद पाटील, कलिंदर तडवी, सेंटरमधील रुग्णसेवेतील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबाॅय, लोकसंघर्ष मोर्चाचे सर्व सेवा समर्पित कार्यकर्ते उपस्थित होते.
चेतना व्यसनमुक्ती केंद्र
जळगाव : चेतना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांच्यासह प्रतीक सोनार, हेमंत देवरे, रवींद्र जाधव, पवन लोखंडे, आदर्श हाडा, वैभव सरोदे, दीपक पाटील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यलयात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी माजी आमदार मनीष जैन, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, माजी नगरसेवक राजू मोरे, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, जिल्हा चिटणीस संजय चव्हाण, अजय बढे, गोटू चौधरी, नामदेव पाटील, पिन्टू शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.