फैजपूर : यावल-रावेर तालुक्याचे भाग्यविधाते बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी शैक्षणिक, सहकार, राजकीय, अध्यात्म या क्षेत्रात पथदर्शी कार्य केले आहे. त्यांनी सुरू केलेले कार्य पुढे चालू ठेवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरू शकते, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.
येथील मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये बाळासाहेबांच्या ९३व्या जयंतीनिमित्त बुधवारी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अखिल भारतीय संत समितीचे संयुक्त महामंत्री श्री राधेराधे बाबा, येथील खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, महानुभाव पंथाचे श्री सुरेशशास्त्री मानेकर बाबा, शास्त्री भक्ती किशोरदासजी महाराज या संतमंडळीसह परिसरातील चाहते उपस्थित होते.
छोटेखानी कार्यक्रमात जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात चौधरी यांनी बाळासाहेबांनी केलेल्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करण्यात आले
यावेळी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर, मधुकर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप गटनेते मिलिंद वाघुळदे, प्रांताधिकारी कैलास कडलग, अहमदनगरचे भूसंपादन अधिकारी डॉ.अजित थोरबोले, मधुकरचे व्हाइस चेअरमन भागवत पाटील, राजीव पाटील, ज्ञानेश्वर महाजन, गोंडू महाजन, धनंजय चौधरी, संजय चौधरी, प्रतिभा मोरे, श्रीकांत महाजन, भगतसिंग पाटील, नगरसेवक कलीम मन्यार, जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, प्रा.मुकेश येवले, चंद्रकला इंगळे, अशोक भालेराव, विजय पाटील, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर.चौधरी, प्राचार्य व्ही.आर.पाटील, प्राचार्य आर.एल.चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.नीलिमा पाटील यांनी केले.