जळगाव : शहरातील शाळा, महाविद्यालय तसेच सामाजिक संस्थांच्या कार्यालयांमध्ये गुरुवारी विविध कार्यक्रमांनी राजमाता जिजाऊ स्मृतीदिन व राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी वेशभूषा साकारीत भाषणेही केली.
मानवसेवा विद्यालय
मानव सेवा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ स्मृतिदिन साजरा करण्यात आला. याावेळी माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, शिशू मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे, ऑनलाइन कार्यक्रमात इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अंकिता पाटील हिने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारली होती. त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. राधिका सुतार हिने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारून एकपात्री नाटक सादर केले.
--------
राज विद्यालय
मेहरूण परिसरातील राज प्राथमिक व माध्यमिक तसेच डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेज मेहरूण येथे राजमाता जिजाऊ यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी एस.ए. पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डी.वाय़. बऱ्हाटे यांनी केले तर आभार व्ही.डी. नेहते यांनी मानले.
--------
सुजय महाजन विद्यालय
राजमाता जिजाऊ व राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादनाचा कार्यक्रम सुजय महाजन विद्यालयात पार पडला. याप्रसंगी मुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेश पाटील, पूजा तवटे, मुक्ता देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
----------
मातोश्री जैन विद्यालय
मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना धांडे, धनश्री फिरके, रोहिणी सोनवणे, लीना नारखेडे, मोहिनी चौधरी, रूपाली वानखेडे, अविनाश महाजन, नरेश कोळी, दीपक भोळे आदींनी परिश्रम घेतले.
----------
संस्कृती विद्यालय
मेहरूण येथील संस्कृती माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ स्मृतिदिनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका डी़ एस़ येवले यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांना गुगलमीटद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कृष्णा गंडाळ, गौरागी पाटील, रेणुका हटकर, नम्रता विसपुते यांनी भाषणे केली. सुहास कोल्हे यांनी राजमाता जिजाऊ यांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.