रिपाइं आठवले गटाकडून शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पक्षाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. रमाबाई ढिवरे, मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, प्रतिभा भालेराव, प्रताप बनसोडे, सागर सपकाळे, किरण अडकमोल, सचिन अडकमोल, नरेंद्र मोरे, प्रशांत पाटील, अजय अडकमोल, बबलू शिंदे, बापू धामणे, शंकर आराक शेख, हरीश शिंदे, सतीश गायकवाड, शकील पिंजारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कानळदा येथे योग शिबिर
कानळदा येथे कर्तव्य ग्रुप कानळदा यांच्या संयुक्त विद्यमानाने योग शिबिर घेण्यात आले. सरपंच पुंडलिक सपकाळे, ग्रा.पं. सदस्य प्रमोद चव्हाण, संदीप पाटील कर्तव्य ग्रुपचे पदाधिकारी तुषार विसपुते, जितू सपकाळे, वैभव चव्हाण, तुषार भोई, रितेश भोई, प्रमोद भोई, दिलीप साळुंखे आदी उपस्थित होते.
श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानतर्फे पाणपोईचे उद्घाटन
श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोंबडी बाजार येथे प्रतिमेचे पूजन शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रेरणा मंत्र आकाश फळे यांनी सादर केला. जितेंद्र दाभाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. राकेश लोहार, ललित खडके, किरण सोनवणे, दिनेश मिस्तरी, मुकेश कोळी, हेमंत चौधरी, हर्षल झाल्टे, राकेश तिवारी, किशोर भोसले, डॉ हितेंद्र गायकवाड, विश्व हिंदू परिषद महानगर उपाध्यक्ष हरीश कोल्हे आदी या ठिकाणी उपस्थित होते.
रामेश्वर कॉलनी येथील स्मशानभूमीची सामूहिक स्वच्छता करण्यात आली. श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, राहुल परकले, सूरज दायमा, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निर्मूलन समिती जिल्हा सहसचिव विजय लुल्हे, किरण कोलते, सामाजिक कार्यकर्त्या यामिनी लोहार, सुजाता सिद्धपुरे यांनी सहभाग घेतला. स्मशानभूमीतील महानगर पालिकेचे सुरक्षा रक्षक कृष्णा शिरसाळे यांचा मी मराठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राहुल परकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
राष्ट्रीय दलित पँथर
राष्ट्रीय दलित पँथरतर्फे सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हाध्यक्ष राजू महाले, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हेरोळे, जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरीकर यांनी प्रतिमा पूजन केले. जिल्हा उपाध्यक्ष श्याम सोनवणे, तालुकाध्यक्ष संघदीप महाले, उपजिल्हाध्यक्ष उर्मिला खैरनार, सदस्य सविता लाखेंडे, कामगार अध्यक्ष प्रमोद भालेराव, अण्णा सोनवणे, भूषण पाटील, प्रवीण पाटील, किरण पाटील, मयूर कोळी, विजय बाविस्कर, अमोल पाटील, विजय सोनवणे आदी उपस्थित होते.
फोटो आहे.