जागतिक ग्राहक दिनानिमित्त सोमवारी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव : जागतिक ग्राहक दिनानिमित्त १५ मार्च रोजी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कार्यक्रम वेबिनारद्वारे दुपारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. वेबिनारद्वारे तालुका तहसील कार्यालयांनी ऑनलाईन उपस्थित रहावे तसेच सदर कार्यक्रमास तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकारी, खातेप्रमुख यांनीही ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी सांगितले.
फुले मार्केट परिसरात कचऱ्याचे ढीगजळगाव : महात्मा फुले मार्केट तसेच सेंट्रल फुले मार्केट परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहे. यात काही रोहित्रांजवळही कचरा साचला असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
दुभाजक स्वच्छ करण्याची मागणी
जळगाव : शहरातील विविध रस्त्यांवर मनपाने वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी दुभाजक उभारले आहेत. मात्र, या दुभाजकांमध्ये प्रचंड कचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या साचल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. यामुळे दुभाजकांमध्ये शहराच्या सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आलेल्या झाडांवरही परिणाम होत आहे. दुभाजक स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.