शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

‘ग्रेटा थनबर्ग’च्या हातात आव्हाणेकर तरुणाईचा हात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:23 AM

शुक्रवारी मानवी साखळीव्दारे ‘क्लायमेट स्ट्राईक’ मध्ये सहभागी

अजय पाटीलजळगाव : हवामान बदलाच्या प्रश्नावर जगभरातील शासनाचे लक्ष वेधणाऱ्या व पर्यावरण बचावसाठी पुढे सरसावलेल्या ग्रेटा थनबर्गच्या समर्थनासाठी आता तालुक्यातील आव्हाणे येथील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत. ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ अंतर्गत आव्हाणे परिसरातील चार शाळांचे विद्यार्थी शुक्रवारी सकाळी ९ वाजता आव्हाणे फाट्यावर मानवी साखळी करणार आहेत.स्विडनची १६ वर्षीय ग्रेटा थनबर्ग या विद्यार्थिनीने सुरु केलेल्या आंदोलनाला नवी दिशा प्राप्त झाली असून, जगभरातील शहरांमध्ये तिच्या समर्थनासाठी नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. पहिल्यांदाच ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थी देखील आता ग्रेटाच्या समर्थनासाठी पर्यावरण बचावचा संदेश देणार आहेत. आव्हाणे येथील वंदे मातरम युवा संघटना, आव्हाणे फर्स्ट, आमदार ग्रृप, मोरया व रामराज्य गृ्रपतर्फे हा उपक्रम राबविला जात असून, यामध्ये जिल्हा परिषदेच्या कन्या व मुलांची शाळा, आचार्य गुरूकुल, शानुबाई पुंडलीक चौधरी हायस्कूल, जि.प. उर्दु शाळा व आॅक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी देखील सहभागी होणार आहेत. याच उपक्रमास खेडी, वडनगरी व फुपनगरी येथील शाळांना देखील सहभागी करून घेण्याचे नियोजन आखले जात असून, २ हजार विद्यार्थी व ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी होणार आहेत.सोशल मिडियावरील व्हिडीओवरून मिळाली प्रेरणाग्रेटा थनबर्गने सुरु केलेल्या ‘क्लायमेट स्ट्राईक’ मोहीमेला सोशल मीडियाव्दारे जबरदस्त प्रसिध्दी मिळत आहे. सोशल मिडियावरील व्हिडीओ पाहिल्यानंतर आव्हाण्यातील विशाल चौधरी, विजय पाटील, राकेश चौधरी, मयुर पाटील, जयेश पाटील, प्रशांत चौधरी, नवल पवार, स्वप्निल जोशी, सनी चौधरी, राहुल पाटील, धनंजय पाटील या युवकांनी बैठक घेत ग्रेटाला समर्थन देत गावातील समस्यांबाबत देखील त्यांनी प्रश्न मांडता यावा यासाठी ही मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला. ही मोहीम केवळ एका दिवसासाठी न ठेवता गिरणा नदीतील अवैध वाळू उपसा, सांडपाण्याची समस्या दुर होईपर्यंत आता ही मोहीम सुरु ठेवण्याचा निर्धार या युवकांनी घेतला आहे. तसेच परिसरातील नागरिकांना एकत्रित करण्याचे नियोजन सुरु आहे.कोण आहे ग्रेटा थनबर्गग्रेटा थनबर्ग या स्विडनमधील १६ वर्षीय विद्यार्थिनीने हवामान बदलावर अवघ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. २० आॅगस्ट २०१८ पासून तीने शुक्रवारी शाळेत न जाता स्विडनच्या संसदेसमोर आंदोलन सुुरु केले. अवघ्या वर्षभरात तिच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जगभरातील नागरिक व संघटना पुढे येत असून, आता तिचे आंदोलन ‘क्लायमेट स्ट्राईक’ म्हणून प्रसिध्द होत असून, या स्ट्राईकमध्ये जगभरातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. राज्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर व औरंगाबादमध्ये देखील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. आव्हाणे येथे होणारा उपक्रम हा ग्रेटाच्या समर्थनार्थ ग्रामीण भागात होणारा पहिलाच उपक्रम मानला जात आहे.ग्रेटाला समर्थनासह देणार ‘गिरणा बचाव’ची हाकहा उपक्रम जरी ग्रेटाला समर्थन देण्यासाठी केला जात असला तरी या उपक्रमातून ‘गिरणा नदीचे’ होणारे गटारीकरण व बेसूमार वाळू उपस्यामुळे नदीचीहोणारी वाताहत याबाबत देखील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून आवाज उठविला जाणार आहे. यासह पर्यावरण संदर्भातील इतर प्रश्नांबाबत देखील प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न विद्यार्र्थ्यांकडून होणार आहे. जळगाव शहरातील काही पर्यावरणवादी संघटनांनी देखील या उपक्रमाला पाठींबा दिला असून, अनेक पर्यावरणप्रेमी देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या शुक्रवारी हा उपक्रम आव्हाणे फाट्यावर करण्यात येणार असून, पुढील शुक्रवारी हाच उपक्रम कानळदा येथे करण्याचे नियोजन देखील आयोजकांकडून सुरु असून, गिरणा नदीलगतच्या गावांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव