जळगाव : त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ अष्टसिध्द गुरूकूल पिठाचे पीठाधीश गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी रविवारी शहरातील विविध स्वामी समर्थ केंद्रांना भेटी दिल्या. गुरूमाऊलींच्या आगमनाने स्वामी समर्थ केंद्रामध्ये अक्षरश: दिवाळी साजरी झाली़ मंदिरावर रांगोळ्या, तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती़ गुरूमाऊलींच्या दर्शनासह, आर्शिवचनासाठी केंद्रांमध्ये भाविकांचा जनसमुदाय उसळला होता़गुरूमाऊली 17, 18 व 19 फेब्रुवारी या तीन दिवसांच्या जिल्हा दौ:यावर होत़े 17 ला त्यांनी अमळनेर, धरणगाव, पारोळा, भडगाव, पाचोरा या शहरांसह तालुक्यातील स्वामी समर्थ केंद्राना भेटी दिल्या़ तसेच सेवेक:यांसह भक्तासोबत हितगुज केली़ 18 ला सकाळी ममुराबाद येथील केंद्राला भेट दिली़ यानंतर रावेर तालुक्यातील रोझोदा, चिनावल, विवरे, रावेर या गावांना भेटी दिल्या़ मध्यप्रदेशातील खोफनार येथे गुरूमाऊलींचा भव्य मेळावा झाला़ मेळाव्यासाठी दीड लाख भाविकांची गर्दी होती़ 19 ला गुरूमाऊली यांनी जळगाव शहरातील कारागृह तसेच ममुराबाद,रामेश्वर कॉलनी, कांचननगर, जानकीनगर येथील केंद्रांना भेटी दिल्या व भाविकांशी हितगुज केल़े यानंतर दुपारी 4 वाजता जामनेर येथे मेळावा झाला़ यानंतर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गुरूमाऊली दिंडोरीकडे रवाना झाल़े केंद्रांना भेटी देते वळी गुरूमाऊली यांच्यासोबत भाऊसाहेब शिंपी, डी़एम़ पाटील, रमेश परदेशी, रविंद्र भावसार यांची उपस्थिती होती़ प्रत्येक केंद्रावर महिला, पुरूष तसेच तरूण, तरूणींनी गुरूमाऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती़ त्यांच्या आगमनाने व दर्शनाने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.जळगाव जिल्हा कारागृहाला सकाळी 8 वाजता गुरूमाऊली यांनी भेट दिली़ याठिकाणी कारागृह अधीक्षक डी़टी़डाबेराव, होमगार्ड जिल्हा सहाय्यक समादेशक संजय रामकृष्ण पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केल़े गेल्या दोन वर्षापासून कारागृहात होमगार्ड भिला चव्हाण, सेवेकरी भगवान बारी, संजय माळी हे गुरूचरित्र पारायण, स्वामी चरित्र, नवनाथ पारायण, देवी सप्तीसतीचे पाठ आदी अनेक कार्यक्रम घेत आह़े यामुळे बंद्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे होमगार्ड जिल्हा सहाय्यक समादेशक संजय पाटील यांनी सांगितल़े गुरूमाऊली यांनी बंदी असलेल्यांचे दु:ख दूर करण्यासाठी त्यांचेवर आध्यात्मिक, नैतीक मुल्य, सहजीवन, सदाचार, सदविचार, सामाजिक सहभावना, राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक आदर्श सुसंस्कारीत मानव घडण्याचे महत्वाचे कार्य स्वामी समर्थ मार्गातून होत असल्याचे सांगितल़ेगुरूमाऊली यांनी जिल्हाभरातील केंद्रांना भेटी दिल्या व हितगुजादरम्यान त्यांनी स्वामी समर्थ यांच्या मार्गातून, ग्राम अभियानातून होत असलेल्या कार्याची माहिती नागरिकांना दिली़ आर्शिवचनात माणूस नावाची जात व माणुसकी नावाचा एकच धर्म असल्याचे ते म्हणाल़े मनुष्य जन्माला आला की तो मातीचा गोळा असतो़ आई हा त्याचा पहिला गुरू. यानंतर प्राथमिक शिक्षक दुसरे गुरू , उच्च शिक्षणात प्राध्यापक तिसरे, व्यावहारिक ज्ञान देणारे चौथे गुरू तर आध्यात्मिक ज्ञान देणारे पाचवे गुरू असतात़ याच पाच गुरूंच्या संस्कारानंतर मानवी आयुष्य सुकर होत़े संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल व धर्म टिकला तर देश टिकेल असा मोलचा संदेशही दिला़आनंदनगर केंद्राला यात्रेचे स्वरूपरविवारी 9़30 वाजता गुरूमाऊली यांनी महाबळ परिसरातील आनंदनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राला भेट दिली़ शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून केंद्र प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केल़े गुरूमाऊलीच्या स्वागतासाठी केंद्रामध्ये ठिकठिकाणी गुढी उभारण्यात आल्या होत्या़ रांगोळी, फुलांच्या पाकळ्यांचा सडा टाकण्यात आला होता़ यशस्वितेसाठी आध्यमिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या ललीता निकम, सचिव विजय निकम, संजय बोरसे , व्यवस्थापक राकेश येवले, सुभाष माने, एस़क़ेवाणी, शंकरशेठ दहारा, शाम जगताप, वसंत राजपूत, वसंतराव जाधव, नितीन रेंभोटकर, एम़डी़ठाकूर, योगेश पढारिया, योगेश शिरनामे, दिपक येवले, नितीन सपके, सरला वाणी, शारदा सपके यांनी परिश्रम घेतल़े
गुरूमाऊंलींच्या आगमनाने आनंदोत्सव
By admin | Published: February 20, 2017 1:14 AM