शेंदूर्णी, ता.जामनेर : शेंदुर्णी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सोयगाव तालुक्यातील धरणात पाणी असूनदेखील पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेंदुर्णी येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील अंधारी येथे पाण्याची समस्या मोठी बिकट झाली आहे.सोयगाव तालुक्यातील नागरिकांनी जलसंपदामंत्री यांनी आमच्या धरणाची उंची वाढवून द्यावी व शेंदुर्णीला लागणारे पाणी तुम्ही नेऊ शकतात असे सर्व राजकीय पक्ष व नागरिक खुल्या मनाने मान्य करतात परंतु महाराष्ट्रातील जलसंपदा सर्वोच्च खातं जामनेर तालुक्याच्या वाट्याला येऊनदेखील शेंदुर्णी व परिसरात नवीन धरण नाही अथवा एकही धरणाची फूटभर देखील उंची वाढलेली नाही.औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील गलवाडा धरणावर शेंदुर्णीसाठी मुख्य पाणीपुरवठा योजना सुरू आहे. गलवाडा धरणातून शेंदुर्णीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणावर मात्र दिवसाला आठ तासच वीजपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा यांनी जर लक्ष घातले असते तर या धरणावर स्वतंत्र फीडर टाकून २४ तास वीजपुरवठा चालू ठेवला असता, परंतु अत्यंत महत्त्वाच्या जीवन मरणाच्या या पाणी प्रश्नाकडे डोळ्यातून पाणी येईपर्यंत देखील शासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेंदुर्णी येथील नगरपंचायतीने या धरणावर डायनामा जनरेटर डिझेल खर्च करून धरणावरून पाणी पाण्याच्या टाकीत पोहोचण्यासाठी लाखोंचा इंधन खर्च करून वेळ मारून न्यायची सर्कस चालवली असल्याची स्थिती आहे.खान्देशातील प्रतिपंढरपूर असलेल्या शेंदुर्णी नगरीत सोयगाव तालुक्यातील धरणातून पाणीपुरवठा नियोजनबद्ध सुरू होता. काँग्रेसच्या ताब्यातील ग्रा.पं. कारभाराच्या वेळेस ४ कोटी २२ लाख रुपये निधी आघाडीच्या सरकारने मंजूर केला; परंतु काम सुरू झाल्यानंतर काहींनी पाण्याची समस्या निर्माण केली. याबाबतचा वाद अद्याप न्यायालयात सुरू असल्याची माहिती मिळाली.पाण्याबाबत प्रशासन झोपलेलेशेंदुर्णीला सोयगावहून पाणीपुरवठा करणाºया पाईप लाईनमध्ये झाडांच्या मुळा येऊन पाणीपुरवठा ठप्प झाला होता, त्यावेळेस झोपलेल्या प्रशासनाला जाग आली. पाईप लाईन शोधता शोधता अखेर पाईप लाईनमधील झाडांच्या मुळापर्यंत पोहोचले. परंतु आज उद्भवलेल्या पाणी प्रश्नावर मात्र शासन पातळीवर पूर्णपणे दुर्लक्षच झाले आहे.शेंदुर्णीला गोंदेगाव धरणाजवळील विहिरीतून पाणीपुरवठा होत होता. यंदा कमी पावसामुळे धरणातील पाणी संपले. विहीर कोरडी पडली. सध्या गलवाडा धरणातून पाण्याची उचल केली जात आहे. जलवाहिनी जीर्ण झाली असल्याने जादा अश्वशक्तीचे पंप चालवू शकत नाही. २४ हजार लीटर क्षमतेच्या दोन शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एक विहीर अधिग्रहीत केली आहे. आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.-राहुल पाटील, मुख्याधीकारी, नगरपंचायत, शेंदुर्णी.
शेंदुर्णी गावाला भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 7:22 PM