जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नंदूरबार येथील आदिवासी अकादमी अंतर्गत स्थापन होणाऱ्या व्यावसायिक व समुदाय शिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन गुरूवारी नंदूरबार येथे होणार आहे़नंदूरबार येथे विद्यापीठाची आदिवासी अकादमी स्थापन झाली आहे. या अकादमी अंतर्गत सहा केंद्र स्थापन केले जाणार असून यातील व्यावसायिक व समुदाय शिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता नंदूरबार येथील मौजे टोकर तलाव भागात हा भूमिपूजन सोहळा होत आहे. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांची उपस्थिती असणार आहे.१०० विद्यार्थी क्षमतेची वर्ग खोलीइमारतीच्या तळमजल्यावर दोन वर्कशॉप, संगणक प्रयोगशाळा, समुदेशन कक्ष, प्रशासकीय कार्यालय असेल. पहिल्या मजल्यावर रोन वर्कशॉप, १०० विद्यार्थी क्षमतेची एक वर्ग खोली व ६० विद्यार्थी क्षमतेची एक वर्ग खोल असेल तर दुसºया मजल्यावर एक वर्कशॉप, वाचनालय, बैठक कक्ष, विभागप्रमुख कक्ष असेल. या इमारतीसाठी एकूण अंदाजित खर्च ५ कोटी असेल, अशी माहिती अकादमीचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिली.
गुरूवारी होणार व्यावसायिक व समुदाय शिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 10:15 PM