विजयकुमार सैतवालजळगाव : जिच्या पाठीवर केवळ हात फिरविल्यास सर्व आजारांपासून मुक्ती मिळू शकते, अशी अफाट शक्ती असलेल्या देशी गायीची गेल्या आठ वर्षांपासून जळगावात सर्व जाती धर्माच्या व्यक्तींकडून सामूहिक गो-सेवा केली जात आहे. यासाठी गो सेवाव्रती अॅड. विजय काबरा यांनी पुढाकार घेतला आहे. या ‘सामूहिक गो-सेवा एक अनुष्ठान’ उपक्रमातून समाजबांधव दर आठवड्याला न विसरता गो-सेवेचे व्रत जपत आहे.गवोप निषदात जगत जननी असा उल्लेख असलेल्या देशी गायीची भक्ती भावाने पूजा-अर्चा केली जाते. यासाठी अॅड. विजय काबरा यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी आठ वर्षांपूर्वी सर्व जाती-धर्माच्या मंडळींची भेट घेऊन त्यांच्याकडून गो-सेवा करण्याचा मानस व्यक्त केला व या यज्ञास सुरुवात केली. हा अखंड यज्ञ आजही सुरूच असून यात सर्व जाती-धर्माचे लोक हिररीने सहभागी होत असल्याचे वेगळे चित्र पहावयास मिळत आहे.सकारात्मक ऊर्जेची प्राप्तीगो मातेच्या निवासस्थानी सकारात्मक ऊर्जा असते. समुहाने येऊन गो-सेवा केल्यास व १० मिनिटे थांबल्यास सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते, असे अॅड. काबरा यांचे म्हणणे आहे. याठिकाणी सर्व समाजबांधवांच्यावतीने गो-मातेस लापसी, गो ग्रास देण्यासह उन्हाळ््यात हिरवा चारा देण्यावर भर दिला जातो.गोमूत्र सर्व आजारांवर रामबाण उपायगो- मातेच्या पाठीवर सूर्यकेतू नाडी असते. तिचा संबंध सूर्यलोकाशी असतो. त्यामुळे या सूर्यनाडीच्या महत्त्वाबाबतचा उल्लेख व्याख्यानात केला जातो. गायीच्या पंचगव्याचे मोठे महत्त्व असून यातील गोमूत्र तर सर्व आजारांवर रामबाण उपाय असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गायीच्या दुधात केवळ देशी गायीचेच दूध घेतले पाहिजे, जर्सी गायीचे दूध अक्षरश: विष असल्याचे अॅड. विजय काबरा यांचे म्हणणे आहे. गो-मातेच्या पाठीवर हात फिरविल्यास रक्तदाब असो की मधूमेह अथवा इतर कोणतेही आजार समूळ नष्ट होतात, असाही त्यांचा दावा आहे.पांझरापोळ संस्थानची निवडया गो -सेवेसाठी अॅड. काबरा यांनी सार्वजनिक संस्था असलेल्या शहरातील पांझरापोळ संस्थानची निवड केली. या ठिकाणी गो-सेवा घडावी म्हणून ते प्रत्येक समाजाच्या प्रमुखास भेटून त्यांना गो-सेवेचे आवाहन करतात. त्यानुसार एक-एक समूह येथे येऊन गो-सेवेचे महान कार्य करीत आहे.धकाधकीच्या जीवनात गो-सेवेचे वाढते महत्त्ववाढदिवसाच्या दिवशी सुरेशदादा जैन यांच्यासह सकल जैन समाजाने एकत्र येत येथे गो-सेवा केली. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही येथे हजेरी लावत सेवेचा लाभ घेतला. याशिवाय माहेश्वरी समाजबांधव दर रविवारी न चुकता येथे येऊन गो-सेवा करीत असतात. धकाधकीच्या या जीवनात गो-सेवेचे महत्त्व सर्वच समाजात वाढत आहे.गो-मातेचे अनन्य महत्त्वगो-सेवेदरम्यान अॅड. विजय काबरा हे येथे आलेल्या प्रत्येक समुहासमोर ‘गो-सेवा एक अनुष्ठान’ या विषयांवर व्याख्यान देतात. धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक, शास्त्रीय, सांसरीक या विविधांगांमध्ये गो-मातेचे किती महत्त्व आहे, हे ते पटवून देतात.सर्वच समाजाकडून घडली सेवामाहेश्वरी समाजाकडून या सामूहिक गो-सेवेस प्रारंभ झाला. त्यानंतर जैन, अग्रवाल, मारवाडी, गुजराती, कच्छी, मुस्लीम, बोहरा, शीख, पारसी अशा अनेक या समाजबांधवांनी गो-सेवा सुरु केली आणि बघता- बघता त्याचे रुपांतर जणू आता चळवळीत होऊ पाहत आहे.
सामूहिक गो-सेवा एक अनुष्ठान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 4:00 PM