जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता दोन महाविद्यालयातील विद्याथ्र्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. शंभर ते दिडशे तरुण एकमेकावर भिडले होते. दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक झाली. त्यात लहान भावाला घेण्यासाठी आलेले पवन सुधाकर बाविस्कर (वय 19 रा.आसोदा,ता.जळगाव) व निलेश घनश्याम वाघ (वय 20 रा.हरिओम नगर, जळगाव) हे दोन तरुण जखमी झाले. या वादामुळे गणेश कॉलनी व कोर्ट चौककडे जाणा:या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.दरम्यान, गुरुवारी प्रताप नगरात सेवानिवृत्त फौजदाराच्या दुकानात टवाळखोरांनी हल्ला चढवून बाप-लेकाला मारहाण केली होती. त्यानंतर दुस:याच दिवशी पुन्हा ही हाणामारी झाली. शुक्रवारी दहावीच्या पेपरसाठी नूतन मराठा महाविद्यालयात विद्याथ्र्याची गर्दी होती. साडे दहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन 60 ते 70 तरुण नूतन मराठा महाविद्यालयात आले व रिंगण करुन त्यांनी काही तरुणांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी अॅँग्लो उर्दू हायस्कूलचेही काही विद्यार्थी तेथे धावून आले. दोन्ही गटाकडून शंभराच्यावर तरुण एकमेकावर भिडल्याने महाविद्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. विद्याथ्र्यामध्ये पळापळ झाली होती तर शिक्षकही कमालीचे घाबरले होते.पोलीस येताच पळापळमहाविद्यालयात हाणामारी व दगडफेक होत असल्याने शिक्षकांनी जिल्हा पेठ पोलिसांना कळविले. उपनिरीक्षक गजानन राठोड, महेंद्र बागुल, राजू मेढे, छगन तायडे यांच्यासह शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारीही तत्काळ दाखल झाले.तरीही गर्दी नियंत्रणात येत नसल्याने नियंत्रण कक्षातून दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. दगडफेक करणा:या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला तेव्हा पळापळ झाली व गर्दी कमी झाली.चौघांना घेतले ताब्यात; सलग दुस:या दिवशी वाददगडफेकीत पवन सुधाकर बाविस्कर व निलेश घन:श्याम वाघ हे दोन तरुण जखमी झाले. त्यांना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गर्दीत प्रवेशद्वार उघडण्यास मज्जाव करणा:या हिरा प्रकाश सपकाळे (वय 20 रा.मोहन टॉकीज, जळगाव), मयुर भागवत चौधरी (वय 18 रा.कांचन नगर, जळगाव), हिमांशु संजय भाटीया (वय 18 रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) व नानीमोद्दीन सलीमोद्दीन शेख (वय 18 रा.गेंदालाल मील, जळगाव) या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. संध्याकाळर्पयत कोणीही तक्रार द्यायला न आल्याने प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना सोडून देण्यात आले. घटनेचे कारण या तरुणांनीही सांगितले नाही.गोंधळामुळे वाहतूक खोळंबलीदोन्ही गटाकडून रस्त्यावर दगडफेक झाल्याने पळापळ झाली होती. यावेळी मुख्य रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. यावेळी निष्पाप लोकांना व विद्याथ्र्याना दगडाचा मार सहन करावा लागला. इतकी मोठी घटना घडल्यानंतरही महाविद्यालयाकडून तक्रार देण्यात आली नाही. किंवा घटनेचेही कारण कोणी सांगितले नाही.
नूतन मराठा महाविद्यालयात विद्याथ्र्याच्या 2 गटात हाणामारी
By admin | Published: April 01, 2017 12:56 AM