शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

प्रामाणिक व्यावसायिकांसाठी जीएसटी फायदेशीर-उमेश शर्मा

By admin | Published: July 06, 2017 12:01 PM

तेरापंथ प्रोफेशनल फोरमतर्फे आयोजन; ‘लोकमत’ मीडिया पार्टनर

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.6 - स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी कर सुधारणा मानली जात असलेल्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) मुळे किती फायदा होईल, हे सांगणे कठीण असले तरीही जुन्या कर पद्धतीतील अनेक त्रुटी यात दूर झाल्या आहेत. प्रामाणिकपणे व्यवसाय करणा:यांना जीएसटी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट उमेश शर्मा यांनी बुधवारी नटवर मल्टिप्लेक्स येथे आयोजित व्याख्यानात व्यक्त केले. 
तेरापंथ प्रोफेशनल फोरम, एकता रिटेल किराणा व्यापारी असोसिएशनतर्फे व्यावसायिक, सामान्य नागरिक तसेच विद्याथ्र्यासाठी ‘जीएसटी’ वर  या सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत’ मीडिया पार्टनर होते. 
या वेळी व्यासपीठावर  तेरापंथ प्रोफेशनल फोरमचे अध्यक्ष महावीर जैन, राष्ट्रीय उपाध्यक्ष बलवंत चोरडिया, पश्चिम विभागाचे सचिव राज संघवी, तसेच एकता रिटेल किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर भावनगरवाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वालनाने झाली. याप्रसंगी सीए असोसिएशनच्या अध्यक्षा पल्लवी मयूर उपस्थित होत्या. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी व वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांनी सीए उमेश शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
साध्या सोप्या भाषेत साधला संवाद
‘लोकमत’मध्ये करनीती या स्तंभाचे लेखन करणारे सीए शर्मा यांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेत उपस्थितांशी संवाद साधला. जीएसटीला भूत, सून, मुलगी अशा उपमा देण्यात येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर ते म्हणाले की, जीएसटीबाबत अज्ञान असेल तर हे भूत आहे, शंका असेल तर सून आहे आणि  पूर्ण ज्ञान असेल तर मुलगी आहे. 
शर्मा म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर प्रथमच करप्रणातील मोठा फेरबदल करणारा निर्णय झाला आहे. त्यातही आयजीएसटीचा म्हणजेच आंतरराज्य, आंतरराष्ट्र व्यवहारांवर कर लावण्याची संकल्पना जीएसटीमध्ये समाविष्ट करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. त्यामुळे या करप्रणालीच्या अंमलबजावणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जीएसटीमुळे आधीच्या करप्रणातील 17 कर रद्द झाले असून त्यांचा जीएसटीत समावेश झाला आहे.
जीएसटीमध्ये प्रत्येक व्यवहारावर कर लागणार आहे. जीएसटीत खरेदी किंमत कमी झाली, तर एक्साईज डय़ूटी व व्हॅटचा समावेश करून जीएसटीचे दर ठरविले. खरेदी व विक्री किमतीतील तफावत वाढली म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट वाढला तर खुलासा द्यावा लागणार आहे. हा नफेखोरीविरोधातील (अॅण्टी प्रॉफिटिंग लॉ)  कायदा असल्याचे त्यांनी सांगितले. जीएसटीमध्येदेखील केंद्राचा हिस्सा असलेला सीजीएसटी, राज्याचा हिस्सा असलेला एसजीएसटी, तसेच आंतरराज्य अथवा आंतरराष्ट्र व्यवहारासाठी आयजीएसटी, केंद्रशासीत प्रदेशांसाठी यूटीजीएसटी व भरपाई अनुदान (कॉम्पेन्सेशन सेस ) असे पाच प्रकार आहेत. 
5 टक्के कर जर एखाद्या वस्तूवर आकारला गेला, तर त्यातील अडीच टक्के सीजीएसटी तर अडीच टक्के एसजीएसटी याप्रमाणे आकारला जाईल. तसेच त्याचप्रमाणे हिशेबही ठेवावा लागेल. बिलावर, रेकॉर्डला याची स्वतंत्र नोंद ठेवणे बंधनकारक असल्याचे सांगितले. 
केवळ ‘डिस्काउंट’ शब्दाचाच वापर
जीएसटीमध्ये केवळ ‘डिस्काउंट’ याच शब्दाचा वापर ग्राह्य धरला जाणार आहे. मग ते डिस्काऊंट कोणत्याही स्वरूपात असले, तरी ते व्यापारी ते व्यापारी (बी टू बी) असले तर ते कितीही असले तरी ती किंमत बिलात (इन्व्हॉइसमध्ये) लावल्यास मान्य केली जाईल. मात्र, तीच सूट व्यापारी ते ग्राहक (बिङिानेसमॅन टू कन्झुमर) असली तर मात्र मार्केट व्हॅल्यूची संकल्पना तेथे लागू होईल. जीएसटीमध्ये पैसे दिले तरच कर लागू होतो. त्याचप्रमाणे समोरच्याकडून पैसे घेतले नाही, तरी कर भरावा लागणार आहे.
सूत्रसंचालन शीतल जैन यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सीए श्वेता चोरडिया यांनी करून दिला. यशस्वितेसाठी महावीर जैन,मुर्तझा बंदुकवाला, रवींद्र छाजेड यांच्यासह पदाधिका:यांनी परिश्रम  घेतले.