जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पहिल्या क्रीडा महोत्सवात मैदानी स्पर्धेतील महिला गटाचे सांघिक विजेतेपद नंदुरबारच्या जी.टी.पी. महाविद्यालयाने तर पुरुष गटाचे सांघिक विजेतेपद रावेरच्या श्री.व्ही.एस.नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने पटकावले. पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी या क्रीडा महोत्सवाचा प्रचंड जल्लोषात समारोप झाला.शनिवार पासून विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पहिल्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले होते. सोमवारी गुलाबराव पाटील यांच्याहस्ते या महोत्सवातील विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्याध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्रा.नितीन बारी, दीपक पाटील, डॉ.रत्नमाला बेंद्रे, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, शब्बीर सैय्यद, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, प्रा.धामणे, प्रा.प्रतिभा ढाके, प्रा.सतिष कोगटा, डॉ.अनिता कोल्हे, प्रा.के.पी.पाटील, प्रा.व्ही.एल.पाटील, मनोज चौधरी आदी उपस्थिती होते.यश-अपयशाची पर्वा न करता चिकाटीने खेळले पाहिजेसमारोप कार्यक्रमाप्रसंगी गुलाबराव पाटील म्हणाले की, अंगी असलेल्या नैपुण्याचे सोने करण्याची संधी म्हणजे हा क्रीडा महोत्सव आहे. यश-अपयशाची पर्वा न करता खेळाडूंनी चिकाटीने खेळले पाहिजे. राजकारण्यांकडून हा चिकाटीचा गुण खेळाडूंनी घ्यावा. असे सांगून ते म्हणाले की, या महोत्सवात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना बरीच पारितोषिके प्राप्त झाली आहेत. त्यामुळे एका अथार्ने महात्मा फुले यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सर्वच क्षेत्रात मुली अग्रेसर असून आता निवडीचे स्वातंत्र मुलींकडे गेले आहे. अभ्यास आणि खेळ याची सांगड घालून आयुष्यात यशस्वी व्हा असे ते म्हणाले.दरवर्षी होणार क्रीडा महोत्सवअध्यक्षीय समारोपात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी दरवर्षी हा क्रीडा महोत्सव आयोजित केला जाणार असल्याचे जाहिर केले. क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी प्रास्ताविकात या महोत्सवात ७५० खेळाडू सहभागी झाल्याची माहिती दिली. खेळाडूंच्यावतीने उन्मेष कोकणी, (नवापुर), कल्याणी देवरे (धुळे) आणि संघव्यवस्थापकांच्यावतीने प्रा.बी.आर.मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.जी.ए.उस्मानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.असा आहे निकाल- व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष प्रथम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापुऱ, द्वितीय एस.एम.एम.साहित्य,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा़, तृतीय श्रीमती एन.एन.चौधरी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुसुंबा़, उत्कृष्ट स्मॅशर- प्रफुल्ल पाटील, एस.एम.एम. साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा़, उत्कृष्ट सेंटर- सागर बच्छाव, श्रीमती एन.एन.चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कुसुंबा़, अष्टपैलु खेळाडू- दुर्गेश सोनार, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नवापुऱ- व्हॉलीबॉल स्पर्धेत महिला प्रथम मा.ध.पालेशा वाणिज्य महाविद्यालय,धुळे़ द्वितीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापुऱ, तृतीय डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय,जळगाव़, उत्कृष्ट स्मॅशर- रुचिका मराठे, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,धरणगाव, उत्कृष्ट सेंटर- नंदिनी शर्मा, मा.ध.पालेशा वाणिज्य महाविद्यालय,धुळे़, अष्टपैलु खेळाडू- रोहिणी कोकणी, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नवापुऱ- खो-खो स्पर्धेत पुरुष प्रथम जी.टी.पाटील महाविद्यालय,नंदुरबाऱ, द्वितीय मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव़, तृतीय एस.पी.डी.एम.चे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,शिरपुऱ, उत्कृष्ट संरक्षक- श्रीराम कोकणी, जी.टी.पाटील महाविद्यालय,नंदुरबाऱ, उत्कृष्ट आक्रमक- निरंजन ढाके, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव़, अष्टपैलु खेळाडू- सोहेल गावितजी.टी.पाटील महाविद्यालय,नंदुरबाऱ- खो-खो महिला प्रथम विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालय,विसरवाडी़, द्वितीय वसंतराव नाईक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,शहादा़, तृतीय मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव़, उत्कृष्ट संरक्षक- वैशाली पाडवी, वसंतराव नाईक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,शहादा़, उत्कृष्ट आक्रमक- गायत्री वळवी , विसरवाडी,अष्टपैलु खेळाडू- सुवर्ती नाईक, विसरवाडी़- कबड्डी पुरुष प्रथम अॅड.एस.ए.बाहेती कला.वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,जळगाव़, द्वितीय एन.एस.एसचे उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, दहिवेल़, तृतीय झेड.बी.पाटील महाविद्यालय,धुळे़, उत्कृष्ट चढाई- हितेश राठोड, दहिवले, उत्कृष्ट पकड- आकाश साखरे, झेड.बी.पाटील महाविद्यालय,धुळे़, अष्टपैलु खेळाडू- प्रविण बि?्हाडे, अॅड.एस.ए.बाहेती कला.वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,जळगाव़- कबड्डी महिला प्रथम झेड.बी.पाटील महाविद्यालय,धुळे़, द्वितीय मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव़, तृतीय म.गां.ता.शि.मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,चोपडा़, उत्कृष्ट चढाई- अरविना पावरा, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव़, उत्कृष्ट पकड- कामिनी पाटील, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,चोपडा़, अष्टपैलु खेळाडू- मयुरी बागुल, झेड.बी.पाटील महाविद्यालय,धुळे़- मैदानी स्पर्धा चॅम्पियनशिप पुरुष- श्री.व्ही.एस.नाईक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,रावेऱ, मैदानी स्पर्धा चॅम्पियनशिप महिला- जी.टी.पाटील महाविद्यालय,नंदुरबाऱ, उत्कृष्ट अॅथलिट पुरुष- भागवत महाजन, श्री.व्ही.एस.नाईक कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,रावेऱ, उत्कृष्ट अॅथलिट महिला-भारती पावरा, जी.टी.पाटील महाविद्यालय, नंदुरबाऱ
क्रीडा महोत्सवात जीटीपी व नाईक महाविद्यालयाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 9:42 PM